‘फ्री दिवाळी गिफ्ट! लगेच क्लेम करून मिळवा डिलीवरी’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? सध्या सर्वत्र फक्त दिवाळीचीच चर्चा सुरू आहे. दिवाळीचे ऑफर्स, त्यावर मिळणारे गिफ्टस याचे सर्वांनाच आकर्षण असते. पण तुम्हाला जर फोनवर दिवाळी गिफ्टचा कोणता मेसेज आला तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. कारण काही चिनी कंपन्यांकडुन तुम्हाला फसवून डेटा चोरी करण्यासाठी हा सापळा रचण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) ने या नव्या स्कॅमबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार युजर्सना एक लिंक शेअर करण्यात येत आहे, ज्यावर क्लिक करताच चिनी वेबसाईट सुरू होते. या वेबसाईटवरून तुमचा वैयक्तिक डेटा अगदी बँक डिटेल्ससुद्धा चोरी केले जाते.

आणखी वाचा : WhatsApp New Feature : व्हॉटसअ‍ॅपवर आले नवे ‘कॉल लिंक’ फीचर; कसे वापरायचे जाणून घ्या

‘सीईआरटी’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘ व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक मेसेज फॉरवर्ड करण्यात येत आहे. ज्यात दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या गिफ्ट्सचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये मुख्यत महिलांना टार्गेट करण्यात येत असून त्यांना गिफ्ट्स मिळवण्यासाठी अधिकाअधिक लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करण्यात सांगण्यात येत आहे.’ अशी माहिती देण्यात आली आहे. फॉरवर्ड केल्याशिवाय गिफ्ट मिळणार नाही, या भीतीने लोक लगेच मेसेज ओपन करून फॉरवर्ड करत आहेत आणि स्वतःसोबत इतरांच्या नुकसानासही कारणीभूत ठरत आहेत. या वेबसाईट्सच्या शेवटी ‘.Cn’ असे डोमेन एक्सटेंशन वापरले जात असल्याची माहिती नॅशनल सायबर सेक्युरिटी सेलने दिली.

या ‘स्कॅम’पासून कसे वाचायचे

  • या स्कॅमपासून वाचण्यासाठी सर्वात आधी कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर क्लिक करू नका.
  • जर तुम्हाला एखादी वेबसाईट योग्य असल्याचे आणि त्यात खरच गिफ्ट मिळणार असल्याचा विचार येत असेल तर क्लिककरण्याआधी त्या साईटची विश्वासार्हता तपासा.
  • कोणतीही मूळ आणि विश्वासार्ह वेबसाईट तुमच्याकडे लॉगिन किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स प्रश्नावलीद्वारे मागणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा.
  • यासह अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी तुमचा वैयक्तिक डेटा कधीही विश्वासार्ह नसलेल्या कोणत्याही वेबसाईट्सशी शेअर करू नये.
  • अशा स्कॅममध्ये बऱ्याच वेळा आर्थिक व्यवहारांचा समावेश असल्याने यापासून वाचण्यासाठी तुम्ही युपीआय ट्रांजॅक्शनवर ट्रान्सफर लिमिट ठेऊ शकता.
  • अशाप्रकारे ‘दिवाळी गिफ्ट्स’च्या स्कॅमपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free diwali gifts how to beware of chinese website scams know more pns