Friendship Day 2024 Gift Ideas: एखादं संकट आलं, एखादी आनंदाची बातमी सांगायची असेल तर हक्काने एका खास व्यक्तीला फोन लावला जातो, तो म्हणजे मित्र-मैत्रिणीला. प्रत्येक सुख-दुःखात आपलं बोलणं, आपलं म्हणणं ऐकून घेणाऱ्या त्या मित्राचा उद्या दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे आहे. म्हणजेच भारतामध्ये ४ ऑगस्ट रोजी अर्थातच उद्या ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आपण सगळेच मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड, ग्रीटिंग्स किंवा आणखीन काही खास देतो. पण, जर यावर्षी तुम्हाला तुमच्या एका खास मित्राला थोडी महाग, पण उपयोगी अशी भेटवस्तू (गिफ्ट) म्हणून द्यायची असेल तर तुम्ही पुढील काही पर्यायांचा नक्की विचार करू शकता…

१. नॉइज व्होर्टेक्स प्लस स्मार्टवॉच :

नॉइज व्होर्टेक्स प्लस या नव्या स्मार्टवॉचची किंमत २,९९९ रुपये इतकी आहे. हे १.४६ इंच AMOLED डिस्प्ले, ऑल्वेज -ऑन डिस्प्ले (AoD), ब्लूटूथ कॉलिंग, स्लीक मेटल फिनिश, सात दिवसांची बॅटरी लाइफ देते. हे घड्याळ एका नवीन OS वरदेखील चालते, ज्यामध्ये १०० कॅस्टमाइज वॉच फेस आहेत.

Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
loksatta editorial on girl marriage age
अग्रलेख: दहा ते २१!
parenting friendship the role of parenting in shaping the friendship
इतिश्री: मैत्रीतलं पालकत्व
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
loksatta kutuhal efficient and intelligent humanoid robots of future
कुतूहल : भविष्यातील कार्यक्षम आणि बुद्धिमान ह्यूमनॉइड

२. रिलालमी बड्स टी ३०० टीडब्ल्यूएस एअरबड्स :

२,२९९ मध्ये उपलब्ध असलेल्या रिलालमी बड्स टी ३०० टीडब्ल्यूएस एअरबड्स ४० तासांपर्यंत खेळण्याचा वेळ, ३० डीबी ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC), डॉल्बी ॲटमॉससह 360-डिग्री स्पेशियल ऑडिओ आणि 12.4 मिमी डायनॅमिक बास बूस्ट ड्रायव्हर प्रदान करतात. ते पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी IP55 रेट केलेले आहेत आणि ब्लूटूथ v5.3 लाही सपोर्ट करते.

हेही वाचा…Friendship Day 2024: तेरे जैसा यार कहा! ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने दोस्तांना Texts Wishes, WhatsApp Messages द्वारे खास मराठीतून पाठवा शुभेच्छा

३. सोनी प्लेस्टेशन 5 कन्सोल :

PS5 स्लिम एडिशन, ज्याची किंमत ५४,९९० आहे; जे एक पॉवरफुल गेमिंग टेक्नॉलॉजीला एका आकर्षक आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये पॅक करते. 1TB च्या SSD स्टोरेजसह, गेमर त्यांची आवडते टायटल्स (titles) सहज उपलब्ध ठेवून गेमप्रेमींचा अनुभव आणखीन खास करते.

४. ॲमेझॉन इको डॉट आणि विप्रो ९ डब्ल्यू स्मार्ट बल्ब :

ॲमेझॉन ६,१६८ रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या कॉम्बोमध्ये नवीन इको डॉट आणि विप्रो ९ डब्ल्यू एलईडी स्मार्ट बल्बचा समावेश आहे. इको डॉटचे इनबिल्ट मोशन डिटेक्शन, तापमान सेन्सर, ऑटोमॅटिक लायटिंग, एसी नियंत्रण करण्यास परवानगी देतात; जे अलेक्सा ॲपच्या रूटीन फीचरचा वापर करून सहज केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, Alexa इंग्रजी, हिंदी दोन्ही भाषेत गाणं, बातम्या, हवामान अंदाज, अलार्म आणि लहान मुलांच्या गोष्टीदेखील सांगतो.

५. वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट ५ जी :

१९,९९९ किमतीच्या, वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट ५ जी मध्ये ८० डब्ल्यू SUPERVOOC जलद चार्जिंगसह 5,500 mAh बॅटरी आहे. फोनमध्ये ५० एमपी सोनी एल्व्हायटी 600 मेन कॅमेरा आणि 6.67-इंच 120Hz AMOLED डिस्प्ले आहे; ज्यामुळे तो फोटोग्राफीसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.