घराबाहेर पडल्यावर स्मार्टफोन, लॅपटॉपची बॅटरी उतरली आणि आपल्याजवळ चार्जर नसेल तर खूप तारांबळ उडते. कारण- इतरांच्या लॅपटॉप व मोबाईलचा चार्जर वेगळा असतो आणि त्या चार्जरद्वारे आपण आपलं डिव्हाइस चार्ज करू शकत नाही. पण, आता तुमची चिंता मिटणार आहे. कारण- ग्राहकांच्या फायद्यासाठी आणि इलेक्ट्रिक चार्जर कमी करण्याच्या उद्देशाने गॅझेट्सच्या चार्जिंग पोर्टमध्ये (Charging Port) मोठा बदल करण्याच्या उद्देशाने नियम लागू करण्यात आला आहे. सरकारने मोबाइल उत्पादकांना सर्व प्रकारच्या फोन आणि स्मार्टफोनसाठी एकच USB टाईप सी चार्जिंग पोर्ट (USB Type C Charging) ठेवण्यास सांगितले आहे.

Mint ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०२६ च्या जूनपासून इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्याचे उद्दिष्ट बाळगले गेलेय. त्या दृष्टीने यापुढे देशात विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन स्मार्टफोन, टॅबलेटसाठी USB-C चार्जिंग पोर्ट अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला अनेक उपकरणांसाठी फक्त एका चार्जरचा वापर करता येईल. तसे झाल्यास बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील आणि इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासही हातभार लागू शकेल. २०२६ पासून विकल्या जाणाऱ्या सर्व लॅपटॉप आणि स्मार्टफोन्स उत्पादकांसाठी हा नियम लागू होईल. पण, सध्याचा किंवा सामान्य फोन आणि इतर वेअरेबल हेडफोन्स, स्मार्टवॉचना हा नियम लागू करण्यात येणार नाही. केंद्रीय आयटी मंत्रालय लवकरच सर्व उपकरण निर्मात्यांना एकाच प्रकारचे चार्जिंग पोर्ट वापरण्याची सूचना देईल किंवा तसा नियम लागू करील.

हेही वाचा…Smartphone Camera Tips: तुमच्या ‘या’ चुकांमुळे स्मार्टफोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब; कशी घ्याल काळजी; ‘हे’ पाच उपाय पाहा

ही कल्पना २०२२ च्या युरोपियन युनियन नियमासारखी आहे; ज्याचा उद्देश पैशांची बचत, इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करणे, असा आहे. युरोपच्या तुलनेत भारत सरकार उत्पादकांना या नियमाचे पालन करण्यासाठी सहा अतिरिक्त महिन्यांचा वेळ देत आहे; ज्यामुळे कंपन्यांना त्यांचे स्मार्टफोन, लॅपटॉप यूएसबी पोर्टमध्ये स्विच करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो. तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सर्व उपकरणांसाठी टाइप-सी पोर्ट वापरण्याची सूचना दिली आहे आणि याबाबतच्या नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जाईल. कारण- USB-C चार्जिंग पोर्ट सोईस्कर आहेत. ते दोन्ही प्रकारे कार्य करतात. कमी चार्जरसह ग्राहकांचे पैसे वाचतील आणि त्यांचा गोंधळही कमी होईल.

युरोपममध्ये या नियमामुळे Apple ने iPhone 15 USB Type-C पोर्टवर स्विच केले होते. यापूर्वी अमेरिकन कंपनीने सर्व आयफोनसाठी लाइटनिंग पोर्ट वापरले होते; जे नंतर USB Type-C वर स्विच केल्याने लाइटनिंग केबल्सच्या तुलनेत जास्त वेगामुळे डेटा ट्रान्स्फर करणेदेखील सोपे झाले आहे.