Bad decisions affected tech companies : तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी २०२२ हे वर्ष खूप नुकसानदायक ठरले. महसुलातील मंदावलेली वाढ, क्रिप्टोमध्ये घट, निरंकुश नेतृत्व शैली आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर खर्च केलेला पैसा यामुळे काही मोठ्या कंपन्यांसह कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लोकांना नोकऱ्यादेखील गमवावा लागल्या. काही चुकीचे निर्णय कसे कंपनीला आर्थिक नुकसानीच्या उंबरठ्यावर आणू शकतात, हे या वर्षी दिसून आले. २०२२ मधील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या अपयशांबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेणे

टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ यांनी ट्विटरची मालकी मिळवणे हा २०२२ मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वात चर्चिला जाणारा प्रकार ठरला. ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर मस्क यांनी एकापाठोपाठ एक घेतेलेल्या निर्णयांमुळे कंपनीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मस्क यांनी ट्विटरची धुरा हातात घेतल्यानंतर ३७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि त्यानंतर शुल्कासह ट्विटर ब्ल्यू टीक सेवा सुरू केली. तिही बनावट खाती वाढल्याच्या तक्रारीनंतर स्थगित करण्यात आली. मात्र, यामुळे मस्क यांच्या नेतृत्वार प्रश्न उपस्थित झाले. या गोंधळामुळे युजर देखील संतपून होते. या प्रकारांमुळे ट्विटरच्या नव्या नेतृत्वाची प्रतिमा ढासळल्याचे चित्र होते.

ट्विटरवर आजच्या मुद्यांवर मोकळेपणाने आणि इतरांच्या विचारांचा आदर होऊन चर्चा व्हावी, असा मस्क यांचा हेतू आहे. मात्र, ट्विटरच्या कंटेट मॉडरेशनबाबत बोलायचे झाल्यास ते सध्या अस्थिर आहे. त्याचे नियम पुन्हा कधी बदलतील हे कोणालाही माहिती नाही. अलीकडेच काही पत्रकारांचे खाते निलंबित करण्यात आले. यावरून ट्विटर हे त्याच्या नव्या मालकाच्या इच्छेशी जोडलेला आहे, असे दिसून येते.

(Whatsapp युजर्स सावधान! ‘Hi Mum’ मेसेज आलाय? मग वेळीच टाळा, अन्यथा होईल मोठे नुकसान)

आपण मुक्त संभाषणाचे पुरस्कर्ते आहोत, असे कदाचित मस्क यांना दाखवयचे असले, तरी त्यांनीच कंपनीच्या धोरणांवर टीक करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या सर्वांचा ट्विटरच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे.

२) मेटावर्ससाठी जग तयार नाही

मेटाने कर्मचारी कपात केल्यानंतर कंपनीचे सीईओ झुकरबर्ग चर्चेत आले. आर्थिक तोट्यामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय झाल्याचे काही अहवालांतून समोर आले होते. असे असले तरी झुकरबर्ग मेटावर्ससंबंधी चाचण्यांमध्ये तल्लीन झालेले दिसून येतात. मात्र, आतापर्यंत मेटावर्सवरील जुगार ज्याला एक व्हर्च्युअल जग म्हणून परिभाषित केले जाऊ शकते, जेथे लोक राहतात, काम करतात आणि खेळतात, तो फ्लॉप ठरला आहे.

कंपनीने मेटावर्समुळे वारेमाप पैसा गमावला आहे. प्रचंड पैसे खर्च करूनही कंपनी त्याच्याशी संबंधित एक उत्पादन युजर्ससाठी तयार करू शकली नाही. या कामामागचा हेतू हा समस्या नाही, मात्र काही मर्यादित लोकच व्हीआर हेडसेटवर काम करू इच्छितात किंवा आभासी जगात मित्रांसोबत सोशलाइज होऊ इच्छितात.

(फोल्डेबल तंत्रज्ञानात स्पर्धा वाढणार, Foldable smartphone नंतर सॅमसंगचे ‘या’ उत्पादनावर काम सुरू)

कालांतराने लोक व्हीआर हेडसेटसह ३ डी सोशल स्पेसमध्ये कार्टून अवतार म्हणून संवाद साधतील या विचारावर झुकरबर्ग यांनी या तंत्रज्ञानावर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत जे मूळ उद्देशापासून दूर आहे. झुकरबर्ग यांना मेटावर्सवर इतका विश्वास होता की त्यांनी गेल्या वर्षी सोशल मीडिया फिर्म अशी कंपनीची असलेली ओळख बदलून ती मेटावर्स कंपनी, अशी केली.

वॉल स्ट्रिटला मात्र झुकरबर्ग यांनी निवडलेला मार्ग आवडला नाही. कंपनीचा जाहिरात व्यवसाय झपाट्याने कमी होत आहे आणि टिकटॉककडून मिळणाऱ्या आव्हानामुळे फेसबुकची लोकप्रियता कमी होत चालली आहे. कंपनीने अलीकडेच ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. व्यवसायाला बसलेला फटका ठीक करण्याऐवजी मेटा एक व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात हात आजमावू पाहात आहे. यामुळे झुकरबर्ग आणि कंपनीबद्दलच्या त्यांच्या व्हीजनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काही मोठ्या लोकांनी कंपनी सोडल्यानंतर कंपनीविषयी तज्ज्ञांचे मत सकारात्मक नाही.

३) अमेझॉन अलेक्साचे अपयश

अमेझॉनने अलीकडेच १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना जाहीर केली होती. यामुळे अलेक्सा व्हॉइस असिस्टंट युनिटला मोठा फटका बसला. याबाबत काहींना आश्चर्य वाटू शकतो, मात्र अलेक्सा विभागाने वर्षानुवर्षे पैसे कमवलेले नाहीत. हार्डवेअर कमी किमतीत विकण्याचे अमेझॉनचे व्यवसायिक मॉडेल आणि स्मार्ट स्पीकरमार्फत अलेक्सा व्हॉइस असिस्टंट उपलब्ध करणे, या निर्णयांमुळे कंपनीला मोठा फटका बसला.

कागदावर कदाचित अमेझॉनने स्मार्ट स्पीकर्सच्या बाजारात वर्चस्व गाजवले असेल आणि त्यामुळे आयओटी उपकरणांसाठी हब होण्यासाठी अलेक्साला मदत झाली असेल, पण यामुळे कंपनीला फायदा झालेला नाही. अलेक्सा व्हॉइस असिस्टंटच्या माध्यमातून लोक अमेझॉनवर अधिक शॉपिंग करतील अशी सुरुवातीची कल्पना होती. मात्र, प्रत्यक्षात अलेक्साचा अधिक वापर हवामनाविषयी माहिती मिळवण्यासाठी आणि गाणी वाजवण्यासाठी होऊ लागला. अमेझॉनने अलेक्सा किंवा अनुदानित किंमतीवर विकत असलेल्या हार्डवेअरमधून कोणतेही पैसे कमवले नाहीत. कमाईच्या संधीचा अभाव आणि अस्पष्ट मार्गामुळे अमेझॉनचा अलेक्सामधील रस कमी झाला.

(Reuse old smartphone : जुन्या फोनला बनवू शकता CCTV, आणखी कोणत्या कामासाठी वापरू शकता? जाणून घ्या)

४) अ‍ॅपलचे गोंधळात टाकणारे उत्पादन

अ‍ॅपलचा 10th gen iPad त्याच्यातील त्रुटींमुळे लोकांमध्ये लोकप्रियता मिळवू शकला नाही. या आयपॅडला नवीन डिजाईन होते, वेगवान ए १४ बायोनिक चिपसेट देण्यात आले होते, नवीन अ‍ॅक्सेसरीज देखील मिळालेत. मात्र, उपकरण सुरू केल्यानंतर त्यातील त्रुटी दिसून आल्यात.

नवीन आयपॅड केवळ पहिल्या पीढीच्या अ‍ॅपल पेन्सिलसह काम करतो. मात्र, लाइटनिंग ऐवजी त्यामध्ये यूएसबी सी पोर्ट देण्यात आल्याने आयपॅडसोबत चार्ज करण्यासाठी त्याला अडाप्टर लागतो. हा आयपॅड मॅजिक किबोर्डबरोबर देखील काम करत नाही. यावर अ‍ॅपलने नवीन मॅजिक किबोर्ड फोलिओ उपलब्ध केला जो खास या आयपॅडसाठी होता. ९ जनरेशन आयपॅडच्या तुलनेत त्याची जागा घेणाऱ्या १० जनरेशन आयपॅडची किंमत अधिक आहे. मात्र ९ जनरेशन आयपॅड अजूनही उपलब्ध आहे. विचित्र डिजाईन असूनही नवीन आयपॅडला परवानगी कशी मिळाली, असा विचार लोकांना पडत आहे.

५) एफटीएक्स कोसळले

क्रिप्टो क्षेत्रात आघाडीची कंपनी एफटीएक्सची दिवाळखोरी आणि तिचे संस्थापक सॅम बँकमन फ्राइड यांच्या अटकेने क्रिप्टो जगाला चांगलेच हादरे बसले. क्रिप्टो क्षेत्रात उभरती कंपनी म्हणून पाहिल्या जाणारी एफटीएक्स बँकमन फ्राइडच्या हाताखाली व्हॉल्युमनुसार तिसरे सर्वात मोठे एक्सचेंज बनले. कमी ट्रेडिंग शुल्क, आक्रमक विपणन धोरणे या सर्वांनी एफटीएक्सला गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढण्यास मदत केली. परंतु, जेव्हा कंपनीवर ग्राहकांची ठेवी इतर कंपनीसाठी वापरल्याचा आरोप झाला, तेव्हा मात्र कंपनीला उतरती कळा लागली.

(‘हे’ ५ फीचर्स मिळाल्यास Iphone 15 दिसेल भन्नाट, वाढू शकते कार्यक्षमता)

एफटीएक्स कोसळणे गुंतवणूकदारांना शिकवते की, अनियंत्रित आर्थिक उद्योगात नेहमीच उच्च धोका असतो. या घटनेमुळे क्रिप्टोकरन्सीचे वर्गीकरण आणि नियमन कसे करावे, याबद्दल वादविवाद तीव्र झाला आहे.