Samsung Galaxy M16 And Galaxy M06 5G Sale Starts Today : भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंगने आज त्यांच्या दोन स्वस्त 5G फोनची विक्री सुरु केली आहे. लोकप्रिय गॅलेक्सी एम मालिकेतील गॅलॅक्सी एम १६ ५ जी आणि गॅलॅक्सी एम ०६ ५ जी (Galaxy M16 5G and Galaxy M06 5G ) भारतात आकर्षक ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Galaxy M16 5G and Galaxy M06 5G मध्ये सेगमेंट लीडिंग ६.७ फुल एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले, Galaxy M16 5G हाय क्वॉलिटी कलर कॉन्ट्रास्ट प्रदान करते, जे एक इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव देते. Galaxy M06 5G मध्ये ६.७ एचडी+ डिस्प्ले आहे, जो बाहेरील सेटिंग्जमध्येदेखील सोशल मीडिया फीड्समधून स्क्रोल करणे शक्य करणार आहे; जी ग्राहकांसाठी एक खास गोष्ट ठरणार आहे.

Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G दोन्हीमध्ये पूर्णपणे नवीन डिझाइन असणार आहे, ज्यामध्ये न्यू लायनर ग्रुप कॅमेरा मॉड्यूल, एक ठळक पण कलर पॅलेट आणि एक एन्हान्स फिनिश आहे, ज्यामुळे ते आकर्षक आणि ट्रेंडी बनतात. दोन्ही उपकरणे आकर्षक आणि अर्गोनॉमिक असणार आहेत. Galaxy M16 5G फक्त ७.९ मिमी स्लिम, तर Galaxy M06 5G ८ मिमी स्लिम असणार आहे.

Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर जो मल्टीटास्किंग काम करतो. सेगमेंटला आघाडीच्या ५ जी बँडद्वारे सपोर्ट, अनलिमिटेड स्पीड आणि कनेक्टिव्हिटीसह युजर्स कुठेही गेले तरी पूर्णपणे कनेक्ट राहू शकतात. फास्ट डाउनलोड, फास्ट अपलोड, स्मूथ स्ट्रीमिंग आणि uninterrupted ब्राउझिंगचा अनुभव घेऊ शकतात.

Galaxy M16 5G मध्ये अधिक स्पष्टतेसाठी सेगमेंट लीडिंग ५० एमपी कॅमेरा आहे, जो ५ एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा असणार आहे. १३ एमपी फ्रंट कॅमेऱ्यासह तुम्ही स्पष्ट सेल्फी कॅप्चर करू शकता. Galaxy M06 5G मध्ये F1.8 अपर्चरसह उच्च रिझोल्यूशन ५० एमपी वाइड-अँगल लेन्स आहे, जो व्हायब्रन्ट आणि डिटेल फोटो कॅप्चर करू शकतो. तर २ एमपी डेप्थ कॅमेरा शार्पर फोटो काढण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त, Galaxy M06 5G मध्ये सेल्फी घेण्यासाठी ८ एमपी फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 25W जलद चार्जिंगला समर्थन देते, ज्यामुळे युजर्सना कमी वेळेत अधिक पॉवर मिळते.

सॅमसंग गॅलेक्सी M16 5G सह 6 जनरेशन ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स आणि गॅलेक्सी M06 5G सह 4 जनरेशन OS अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देते आहे. सॅमसंग गॅलेक्सी M16 5G सह या विभागात प्रथमच सॅमसंग वॉलेटसह त्यांचे नवीन टॅप अँड पे फीचर्स सादर करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना सुरक्षित पेमेंट करता येईल. दोन्ही डिव्हाइसेसमध्ये सॅमसंगचे सर्वात प्रगत सुरक्षा नवा उपक्रम सॅमसंग नॉक्स व्हॉल्टसुद्धा असणार आहे. गॅलेक्सी M16 5G आणि गॅलेक्सी M06 5G मध्ये व्हॉइस फोकस सारखी फीचर्सदेखील समाविष्ट आहेत, जी कॉलदरम्यान आसपासचा आवाज कमी करते, संभाषण स्पष्ट करते.

स्मार्टफोनच्या विक्रीबाबत जाणून घेऊया

Samsung Galaxy M16 5G सह 6 तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 4GB+128GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 11,499 रुपये, 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 14,499 रुपये आहे. स्मार्टफोन ब्‍लश पिंक, मिंट ग्रीन, थंडर ब्‍लॅक रंगात उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी 1000 रुपयांचे कॅशबॅक ऑफर करत आहे.

Galaxy M06 5G 4GB+128GB आणि 6GB+128GB हा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 9,499 रुपये आणि 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन सेज ग्रीन ब्‍लेजिंग ब्‍लॅक या रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 500 रुपयांचे बँक कॅशबॅक ऑफर केले जात आहे.

Story img Loader