सॅमसंगच्या गॅलक्सि M५२ ५जी या स्मार्टफोनवर उत्तम ऑफर उपलब्ध झाली आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून २९ टक्के डिस्काउंटवर खरेदी करता येईल. सॅमसंगने गेल्या वर्षी २०२१ मध्ये त्यांचा एम सीरीज ५जी स्मार्टफोन लॉंच केला होता. स्मार्टफोनच्या या सिरिजमध्ये सॅमसंगने ६४MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरी दिली होती. ज्यामुळे हा स्मार्टफोन या किंमतीच्या सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा चांगला आहे.

सॅमसंगच्या गॅलेक्सी M५२ ५जी वर सवलत

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सॅमसंग गॅलेक्सी M५२ ५जी स्मार्टफोनची किंमत ६ जिबी रॅम आणि १२८जिबी स्टोरेज फोनसाठी ३४,९९९ रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन केवळ २४,९९९ रुपयांमध्ये २९ टक्के सूट मिळवून खरेदी करू शकता. या डीलमध्ये तुम्हाला ७,६८४ रुपयांचा थेट फायदा मिळेल.

याशिवाय, ८जिबी रॅम आणि १२८जिबी स्टोरेजसह सॅमसंग गॅलेक्सी M५२ ५जी स्मार्टफोनची किंमत ३६,९९९ रुपये आहे जी २७ टक्के सूट मिळवून केवळ २६,९९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर १०,००० रुपयांचा थेट फायदा होणार आहे.

सॅमसंग गॅलक्सि M५२ ५जी चे स्पेसिफिकेशन्स

भारतात लॉंच झालेल्या Samsung Galaxy M52 5G या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी+Super AMOLED डिस्प्ले २४००x१०८० पिक्सल रिज्योल्यूशनसह देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यात Qualcomm Snapdragon ७७८G प्रोसेसर ६ जिबी रॅम आणि १२८ जिबी इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात ६४MP चा मेन कॅमेरा, १२MP चा सेकंडरी शूटर आणि ५MP चा मायक्रो स्नॅपर चा अंतर्भाव आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी २५W चर्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात GPS/ A-GPS, NFC, 5G, 4G LTE आणि USB Type-C port देण्यात आलं आहे.

Live Updates
Story img Loader