उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आधार कार्ड बनवणारी टोळी पकडण्यात आली आहे. इथे बनावट पद्धतीने आधार कार्ड बनवले जात होते, या टोळीने आतापर्यंत ३० हजारांहून अधिक आधारकार्ड बनवले आहेत. गाझियाबाद सायबर सेल आणि सर्व्हिस लाइन टीमने संयुक्त कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी छुप्या पद्धतीने बनावट आधार कार्ड बनवत होती आणि कोणाला याची माहितीही नव्हती, असं सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडून अनेक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून २०९ रबर थंब प्रिंट्स, १३७ बनावट आधारकार्ड, आय स्कॅनर, ६१ कागद ज्यावर रेटिना प्रिंट आहे, ३० लॅपटॉप, ९ मोबाईल, ५ आय स्कॅनर, ३ थंब स्कॅनर, प्रिंटर व इतर वस्तू सापडल्या आहेत. त्याचवेळी, चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, अंकित गुप्ता नावाचा व्यक्ती या केंद्राचा संचालक आहे. चौकशीदरम्यान असं समजलं की, अंकितने आसाममधील असुझा कंपनीशी संपर्क साधून आधार कार्ड बनवण्यासाठी बनवलेला ओळखपत्र मिळवला होता.

cyber fraud, fake e-mails, foreign company,
परदेशी कंपनीला बनावट ई-मेल पाठवून दीड कोटींची सायबर फसवणूक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचा आरोप, “आपने बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना बनावट आधार कार्ड..”
Farmers sat bara will now linked to Aadhaar to avoid fraud
शेतकऱ्यांचे सातबारे आधारशी संलग्न; फसवणुकीचे प्रकार टळणार
how to protect and lock your aadhaar card
तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? लॉक करण्यासाठी अन् गैरवापर टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या…
green card permanent citizenship India US Donald trump visa
विश्लेषण : अमेरिकेत ग्रीन कार्ड आणि कायम नागरिकत्वामध्ये फरक काय? किती भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत?
Travelling on ST without a smart card is difficult Pune news
‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा
How To Check Outstanding Loans Linked To PAN Card Online in Marathi
PAN Card Loan Details : पॅनकार्डच्या मदतीने तुमचं थकीत कर्ज कसं तपासता येतं? जाणून घ्या तीन खास टीप्स

आणखी वाचा : Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट या अ‍ॅपवर उपलब्ध असेल, जाणून घ्या कसं वापरायचं?

आधार कार्ड बनवण्यासाठी ५ हजार रुपये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची बनावट आधारकार्ड बनवत असत. ही टोळी आधार कार्ड बनवण्यासाठी ५ हजार रुपये घेत असे. एवढेच नाही तर नाव आणि पत्ता बदलण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये घेत असे. या टोळीने आतापर्यंत किमान ३० हजार बनावट आधार कार्ड बनवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

बनावट आणि खरा आधार असा ओळखायचा
बनावट आणि खरे आधार कार्ड तपासण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवली जात आहे. अलीकडेच UIDAI ने बाजारात तयार केलेल्या PVC आधारवर बंदी घातली आहे. आणि याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, UIDAI संस्थेने जारी केलेले PVC कार्डच वैध असतील. याशिवाय लोकांना बनावट आधार कार्ड बनवण्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुम्हालाही तुमचे आधार कार्ड तपासायचे असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे तपासू शकता.

आणखी वाचा : हा Realme चा १५ हजारांच्या रेंजमधील चांगला बजेट फोन, पण तुम्ही तो घ्यावा का? जाणून घ्या

  • तपासण्यासाठी, प्रथम अधिकृत UIDAI पोर्टलला भेट द्या.
  • येथे My Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक सुविधा उघडतील.
  • यामधून Verify an Aadhaar number हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा व्हेरिफिकेशन करा.
  • आता Proceed to Verify वर क्लिक करा.
  • तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक वैध असल्यास, त्यावर एक नवीन पेज पुनर्निर्देशित केले जाईल.
  • या मेसेजमध्ये आधार कार्ड क्रमांकासह वय, लिंग आणि राज्य अशी माहिती असेल.
  • इथे उल्लेख असेल की हा माहिती इथे नमूद केली आहे.
  • जर कार्ड कधीही जारी केले गेले नसेल, तर हे स्पष्ट होते की ज्या कार्डसाठी पडताळणीची मागणी केली आहे ते बनावट आहे.

Story img Loader