कॅलिफोर्नियात पार पडलेल्या गूगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये (Google I/O 2024) जेमिनी पॉवर एआय (Gemini AI)ची घोषणा केली होती. त्यामध्ये गूगल म्हणाले होते की, लवकरच जेमिनी १.५ प्रो-वर्कस्पेसच्या साइड पॅनलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आता जेमिनी साईड पॅनल जीमेलवरदेखील रोलआउट झाले आहे. जेमिनी १.५ डॉक्स (Docs), शीट्स (Sheets), स्लाइड्स (Slides) व ड्राइव्ह (Drive)व्यतिरिक्त जीमेल (Gmail) साईड पॅनलसाठीही उपलब्ध असेल. तसेच हे अपडेट सध्या तरी प्रीमियम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वर्कस्पेसमध्ये फाइल्स किंवा ईमेल डेटा शोधण्यास लागणारा वेळ जेमिनीद्वारे आता वाचणार आहे.

ही माहिती गूगलने त्यांच्या अधिकृत ब्लॉगमध्ये सांगितली आहे. नवीन अपडेटमुळे युजर्सना फायदा होईल, अशी अपेक्षा वर्तवली आहे. जेमिनी 1.5 प्रो मॉडेलचा उपयोग कॉन्टेक्स्ट विंडो आणि ॲडव्हान्स reasoning याव्यतिरिक्त जीमेलमध्ये ईमेल थ्रेड Summarize करून देणे, ईमेल थ्रेडवर प्रतिसाद काय द्यायचा ते सुचवणे, ईमेलचा ड्राफ्ट करण्यासाठी मदत करणे, तर तुमच्या इनबॉक्समधील ईमेल किंवा तुमच्या गूगल ड्राइव्हमधून एखादी फाईल शोधण्यास तुम्हाला मदत करून देण्यासाठी होणार आहे.

Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO
z morch tunnel
सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
the last book store
बुकमार्क : ‘ऑनलाइन’च्या महापुरातून वाचलेले लव्हाळे…

हेही वाचा…सायबर गुन्ह्यात दिवसागणिक वाढ! हॅकरची शिकार झाली ‘ही’ बँक; बँकेने ग्राहकांना दिला ‘हा’ खबरदारीचा इशारा

कसे कराल जेमिनी ॲक्सेस?

तुम्ही वेबवरील जीमेल (Gmail), डॉक्स (Docs), शीट्स (Sheets), स्लाइड्स (Slides) व ड्राइव्ह (Drive)च्या वरच्या उजव्या कोपऱ्यात “Ask Gemini” (स्पार्क बटण)वर क्लिक करून साइड पॅनलमध्ये तुम्ही सहज जेमिनीमध्ये प्रवेश करू शकता. जर असे केल्यावर तुमच्याकडे जेमिनी दाखवत नसेल, तर तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मदत केंद्राला भेट द्यावी लागेल.

तसेच तुम्ही ईमेल थ्रेड्स summarized करण्यासाठी आणि वेबवरील साइड पॅनेलवर हायलाइट्ससह पाहण्यासाठी Android आणि iOS युजर्स मोबाइल ॲपमध्ये जेमिनीचा वापरू करू शकता. याव्यतिरिक्त मोबाईल फीचर्स जसे की, स्मार्ट रिप्लाय, जीमेलसंबंधित प्रश्न, उत्तरे तर पुढील आठवड्यात Google One AI प्रीमियम, जेमिनी बिझनेस आणि एंटरप्राइझ ॲड-ऑन, जेमिनी एज्युकेशन व एज्युकेशन प्रीमियम ॲड-ऑनसाठीसुद्धा साइड पॅनल पूर्णपणे रोल आउट केले जातील.

Story img Loader