आयफोन हे सर्वात सुरक्षित उपकरण मानले जाते. इतर मोबाइल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो अनलॉक करून वापरण्याची सुविधा बाजारात उपलब्ध आहे. मात्र आयफोनमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तसे होत नाही, ही बाब अशक्य कोटीतील होती आणि त्याबद्दल अॅपलला रास्त अभिमानही होता. मात्र त्याला छेद दिला जॉर्ज हॉट्झ याने. २००७ साली त्याने आयफोन यशस्वरित्या अनलॉक करून दाखवला आणि त्यानंतर सॉफ्टवेअरसह हार्डवेअरमध्येही बदल करण्याची वेळ अॅपलवर आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळेच अॅपल आयफोनचे पुढचे व्हर्जन वेळेआधीच बाजारात आणण्याची नामुष्कीही अॅपलवर ओढवली. त्याच हॉट्झ याला आता ट्विटरच्या इलॉन मस्क यांनी आगळीवेगळी ऑफर दिली…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : कोणत्याही अ‍ॅपशिवाय QR Code स्कॅन करता येणार; फक्त वापरा ही सोपी ट्रिक

ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर इलॉन मस्क यांनी सुरुवातीस कंपनीतील अतिवरिष्ठांना घरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर लगेचच अर्ध्याहून अधिक कर्मचारी वर्ग घरी पाठवला. त्याचा फटकाही कंपनीला बसला आणि ट्विटरचे अनेक ग्राहक सोडून गेले, सेवा संथ झाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना परतण्याचा आग्रहही ट्विटरने करून झाला. अनेकांनी त्यास सपशेल नकार दिला. आता ट्विटरचे रुतलेले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न मस्क यांनी सुरू केला असून त्याचसाठी हॉट्झ याला ही ऑफर दिली आहे.

आणखी वाचा : FIFA WORLD CUP पाहण्यासाठी ‘JIO CINEMA’ला पर्याय शोधताय? डाऊनलोड करा ‘ही’ अ‍ॅप्स

ट्विटरचे मुख्यालय असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये १२ आठवड्यांची इंटर्नशिप हॉट्झला दिली आहे. या इंटर्नशिपदरम्यान जॉर्ज ट्विटर सर्चवर काम कऱणार आहे. त्याने त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये याचा थेट उल्लेखच केला आहे. गुगल सर्चसारखा ट्विटर सर्चचा वापर लोक करू लागतील, अशा प्रकारचे बदल त्यात करणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान , या ऑफर संदर्भातील पोस्ट जॉर्जने केल्यानंतर अनेकांनी विविध समस्याच त्याच्याकडे मांडल्या असून त्याच्या इंटर्नशिप दरम्यान त्याने त्या समस्यांची सोडवणूक करावी, अशी गळ त्याला घातली आहे.