देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने अॅक्सिस बँकेसोबत मिळून क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. याला ‘Airtel Axis Bank Credit Card‘ असे नाव देण्यात आले असून या कार्डच्या मदतीने वापरकर्त्यांना अनेक विशेष फायदे मिळत आहेत. या क्रेडिट कार्डच्या मदतीने वापरकर्ते रिचार्ज आणि बिल पेमेंटवर सवलत मिळवण्याबरोबरच इन्स्टंट लोन देखील घेऊ शकतात.

यातच आता तुम्हाला एअरटेल मोबाईल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर ‘एअरटेल थँक्स अॅप’द्वारे २५ टक्के खात्रीशीर कॅशबॅक देखील मिळणार आहे. यासाठी तुमच्याकडे एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

काय आहेत फायदे ?

जर तुम्ही वीज, गॅस आणि पाण्याचे बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा स्विगी आणि झोमॅटो वरून खाद्यपदार्थ ऑर्डर कराल, तर एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी एक उत्तम कार्ड ठरणार आहे.

आणखी वाचा : ‘Google Pixel 7a’ Tensor G2 चिपसेटसह लाँच होणार; फीचर्स आले समोर

एअरटेल थँक्स अॅपवर हे क्रेडिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना अधिक फायदा होईल. हे एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील वापरले जाऊ शकते.

Story img Loader