Spotify Premium Subscription: स्वीडिश म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Spotify ने एक उत्तम ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत कंपनी एक किंवा दोन नव्हे तर तीन महिन्यांसाठी Spotify प्रीमियमचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. मात्र, कंपनीची ही ऑफर फक्त Spotify नवीन वापरकर्त्यांसाठी आहे. तुम्ही अद्याप Spotify चे प्रीमियम सदस्यत्व घेतले नसेल, तर तुम्ही स्टुडंट प्लॅन आणि वैयक्तिक प्लॅन निवडून तीन महिन्यांच्या मोफत प्रीमियम सदस्यत्वाचा आनंद घेऊ शकता. ही माहिती Spotify ब्लॉग पोस्टमध्ये देण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ कसा घेता येईल आणि या ऑफरची शेवटची तारीख काय आहे ते जाणून घ्या.
Spotify Premium सदस्यता मोफत
Spotify ब्लॉग पोस्टनुसार, Spotify प्रीमियम मोफत दिल्या जाण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर असणार आहे. एकदा हा तीन महिन्यांचा Spotify प्रीमियम कालावधी संपला की, तुम्हाला दरमहा मासिक सदस्यत्वासाठी ११९ रुपये भरावे लागतील, परंतु तुम्ही या मोफत कालावधीच्या मध्यभागी कधीही योजना रद्द करू शकता, ज्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत.
( हे ही वाचा: IPhone 11 मिळतोय २५,००० पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची जबरदस्त ऑफर)
३ महिन्यांसाठी मोफत Spotify Premium कसे मिळवायचे?
ही तीन महिन्यांची Spotify Premium ऑफर मोफत मिळवण्यासाठी, तुम्हाला वेबवरील तुमच्या Spotify खात्यात लॉग इन करणे आवश्यक आहे. तुम्ही मोबाइल अॅपद्वारे Spotify Premium चे सदस्यत्व घेऊ शकत नाही
- सर्वप्रथम सपोर्टेड वेब ब्राउझर (Chrome, Firefox, Edge, Opera आणि Safari) वर Spotify उघडा.
- नंतर प्रीमियम बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही विद्यार्थी योजना आणि वैयक्तिक योजना यापैकी कोणतीही योजना निवडा.
- पुढे, बिल्ड युवर प्लॅन विभागाअंतर्गत तुम्हाला तुमची कार्ड माहिती भरण्यास सांगितले जाईल. ती भरा.
- एकदा पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमच्या योजनेचे तपशील आणि त्याची टाइमलाइन पाहण्यास सक्षम असाल.
- याशिवाय, तुम्ही तुमच्या खात्याच्या विभागात तुमच्या योजनेची स्थिती देखील पुष्टी करू शकता.