Smartphone Free Samsung Tv : तुम्ही सॅमसंगचा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आता सुवर्ण संधी आहे. सॅमसंगने भारतात Neo QLED tv, Neo QLED 8 k, द फ्रेम आणि क्रिस्टल ४ के यूएचडी टीव्हीवर नवीन डिल्स आणि ऑफर्सची घोषणा केली आहे. ऑफर्स ३१ जानेवारी २०२३ पर्यंत उपलब्ध असतील.
ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना काही निवडक उत्पादनांच्या खरेदीवर गॅलक्सी झेड फोल्ड ४, गॅलक्सी ए २३ किंवा सॅमसंग साउंडबार मोफत मिळेल. ऑफर्स सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉप आणि सर्व प्रमुख रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असतील. सॅमसंग आपल्या उत्पादनांवर बँक ऑफर देखील देत आहे. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के कॅशबॅकसह २० टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.
(कुणालाही दिसणार नाही हा Folder, खाजगी फाइल्स ठेवण्यासाठी उत्तम, ‘असे’ तयार करा)
सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर मिळतोय हा ऑफर
९८ इंच Neo QLED tv, ८५ इंच आणि ७५ इंच नियो QLED 8 K मॉडेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २ वर्षांच्या वॉरंटीसह १ लाख ५४ हजार ९९९ रुपयांचा Galaxy Z fold 4 स्मार्टफोन मोफत मिळेल. तेच ८५ इंच आणि ७५ इंचचा Neo QLED टीव्ही मॉडेल, ७५ इंच द फ्रेम टीव्ही किंवा ८५ आणि ७५ इंच अल्ट्रा एचडी ४ के क्यूएलईडी मॉडेल खरेदी केल्यास ग्राहकांना ४० हजार ९९९ रुपयांचे HW-S801B सॅमसंग साउंडबार मोफत मिळेल.
इतकेच नव्हे तर ७५ इंच आणि ८५ इंच क्रिस्टल ४ के यूएचडी टीव्ही खरेदी केल्यास ग्राहकांना १८ हजार ४९९ रुपये किंमतीचा गॅलक्सी ए २३ फोन मिळेल.