सोशल साइटवर एक संकल्पना अलिकडे साकारली गेलीये, ती म्हणजे ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’. ज्याप्रमाणे मोठ्या पदड्यावर जसे चित्रपट प्रदर्शित होतात अगदी त्याचप्रमाणे ओटीटीवर सुद्धा अनेक वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. हेच खरं या माध्यमाचे आकर्षण होय. म्हणूनच याचा वाढता प्रेक्षक पाहता या दिवाळीत कंपनीने अवघ्या ५९ रुपयांमध्ये तुम्हाला डिज्नी+हॉटस्टार, झी५ आणि सोनीलिव सारख्या २५ ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळं आता आपलं मनोरंजन स्वस्तात मस्त होणार आहे.
टाटा प्ले बिंज अॅपची मेंबरशीप घ्यावी लागणार
देशात सिनेमासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर कटेंट पाहणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यासाठी ग्राहकांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी हे प्लॅन सादर केले आहेत. लवकरच दिवाळीच्या सुट्या सुरू होणार आहे. या सुट्टयांमध्ये आपल्या करमणुकीसाठी तुम्ही हे माध्यम वापरू शकता. यामध्ये ५९ रुपये भरून तुम्हाला टाटा प्ले बिंज अॅपची मेंबरशीप घ्यावी लागेल. सर्व स्मार्टफोन युजर्स याचा वापर करू शकतात. यामध्ये ५९ रुपये भरून तुम्हाला जवळपास २५ ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळू शकतो. दर महिन्याला ५९ रुपये भरावे लागतील.
फक्त ‘हा’ अॅप डऊनलोड करा
टाटा प्लेचा एक ओटीटी अॅप आहे. टाटा प्ले आधी टाटा स्काय या नावाने ओळखले जात होते. युजरला सर्वप्रथम टाटा प्ले बिंज अॅप डऊनलोड करावे लागेल. परंतु, आता सर्व स्मार्टफोन यूजर्स याचा वापर करू शकतात. या ॲपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे फक्त ५९ रुपये देवून तुम्हाला २५ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे अॅक्सेस देते. सर्वकाही याच ॲपवर मिळेल. याची रक्कम तुम्हाला दर महिण्याला चुकवावी लागणार आहे.
सब्सक्रिप्शन मिळविल्यानंतर या साइड्स पाहता येणार
डिज्नी+हॉटस्टार ( Disney+Hotstar)
झी5 ( Zee5)
सोनीलिव (Sony LIV)
एमएक्स प्लेयर (MX player)
होईचोई
नम्मा फ्लिक्स
चौपाल
प्लॅनेट मराठी ( Planet Marathi)
एरॉस नाऊ ( Eros Now)
सन एनएक्सटी ( Sun NXT)
Voot Select
Voot Kids
हंगामा प्लान
शेमारूमी ( ShemarooMe)
एपीकॉन (EPICON)
डॉक्यूबे ( DocuBay)