ChatGPT Ghibli Image Free: सध्या सोशल मीडियावर Ghibli Art फोटो ट्रेंडचा महापूरच आल्याचे दिसत आहे. घिब्लीने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. Ghibli Art फीचरने धुमाकूळ घातला आहे. सर्वच जण Ghibli Art मध्ये आपला कार्टून फोटो क्रिएट करून सोशल मीडियावर शेअर करत आहे. एआय प्लॅटफॉर्म चॅट जीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून अॅनिमेशन बनवत आहे. लोक स्वतःचे, त्यांच्या पाळीव प्राण्यांचे आणि त्यांच्या सभोवतालच्या ठिकाणांचे फोटो घिब्ली प्रतिमांमध्ये रूपांतरित करत आहेत.

Ghibli स्टाइल म्हणजे काय?

स्टुडिओ घिब्ली (Studio Ghibli) हे एक इमेज जनरेशन टूल आहे. चॅट जीपीटीच्या या वैशिष्ट्याद्वारे, युजर्स त्यांचा कोणताही आवडता फोटो, चित्रपटातील फोटो किंवा कोणत्याही लोकप्रिय मीमला स्टुडिओ घिब्लीच्या (Studio Ghibli) फोटोमध्ये रूपांतरित करू शकतात. नुकतेच ओपन एआयने चॅट जीपीटी प्लस, प्रो आणि टीम वापरकर्त्यांसाठी इमेज जनरेशन फीचर लाँच केलं आहे, ज्यामुळे इंटरनेटवर नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे खरे फोटो जपानच्या प्रसिद्ध स्टुडिओ घिबलीच्या अॅनिमेटेड स्टाईलमध्ये करू शकता. घिब्ली कला म्हणजे स्टुडिओ घिब्लीच्या अनोख्या शैलीतील छायाचित्रे आहेत. ज्यामध्ये पेस्टल आणि म्यूट कलर पॅलेट आणि गुंतागुंतीच्या तपशीलांचा वापर केलेला असतो. ही दृश्य शैली तिच्या सर्जनशील खोलीमुळे आणि कथाकथनाच्या आकर्षणामुळे अ‍ॅनिमे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. स्टुडियो Ghibli हा जपानमधील एक अॅनिमेशन स्टुडिओ आहे, ज्याची स्थापना हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी १९८५ मध्ये केली होती. सध्या हा ट्रेंड AI टूल्सच्या माध्यमातून फोटोंना अॅनिमेशनसारखा लूक देण्यासाठी वापरला जात आहे.

जर तुम्ही तुमच्या फोटोला घिब्ली फोटोमध्ये रूपांतरित केलं नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता चॅट जीपीटी वापरून घिब्ली प्रतिमा तयार करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाही. OpenAI चे ChatGPT तुम्ही मोफत वापरू शकता. कंपनीने हे फीचर प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांसाठी मोफत लाँच केले असून फक्त एक तासात दशलक्ष वापरकर्त्यांनी ChatGPT वापरले असल्याची माहिती समोर आली आहे.

ChatGPT वापरून Ghibli स्टाइल इमेज कशा तयार कराव्यात?

  • सर्वात आधी तुमच्या फोनवर ChatGPT अॅप उघडा.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चॅट जीपीटी वेबसाइटदेखील वापरू शकता.
  • ईमेल आयडी किंवा फोन नंबर वापरून अॅपमध्ये लॉग इन करा.
  • यानंतर फोटो आणि त्याचे तपशिलवार वर्णन प्रविष्ट करा.
  • इमेज जनरेट करण्यासाठी प्रॉम्प्ट सबमिट करा.
  • काही सेकंदात एआय इमेज तयार होईल.
  • तुम्ही फोटो सेव्ह किंवा शेअर करू शकता.