अनेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे किंवा कंपनीची पुनर्रचना करणे अशा अनेक कारणांमुळे कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. Amazon , मायक्रोसॉफ्ट, Apple Meta, Twitter अशा अनेक दिग्गज कंपन्यांनी कपात केली आहे. काही कंपन्यांनी दोन वेळा कपात केली आहे. आता पुन्हा एकदा गुगलची मूळ कंपनी असलेल्या Alphabet ने आपल्या जागतिक रिक्रूटमेंट टीममधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कारण टेक कंपनीने कमर्चारी नियुक्त करणे देखील कमी केले आहे.
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने ग्लोबल रिक्रूटमेंट टीममधील जवळपास १०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीने घेतलेला निर्णय हा जागतिक स्तरावरील टाळेबंदीचा भाग नाही आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये अन्य ठिकाणी भूमिका शोधण्यासाठी मदत होणार आहे. अल्फाबेट कंपनी ही कमर्चाऱ्यांची कपात करणारी या तिमाहीमधील पहिलीच ‘बिग टेक’ कंपनी ठरली आहे. मेटा,मायक्रोसॉफ्ट आणि Amazon सारख्या कंपन्यांनी २०२३ च्या सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
हेही वाचा : टेलिकॉम क्षेत्रात उडाली खळबळ! ‘ही’ कंपनी आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
कॅलिफोर्नियामध्ये स्थित असणाऱ्या अल्फाबेट कंपनीने जानेवारीमध्ये सुमारे १२ हजार नोकऱ्यांची कपात केली आहे. म्हणजेच त्यांनी एकूण ६ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. Challenger, Gray आणि Christmas या एम्प्लॉयमेंट फार्मच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ऑगस्टमधील कपात ही जुलैच्या तुलनेत तिप्पट आहे तर एक वर्षाच्या तुलनेत चार पटीने वाढली आहे. रॉयटर्सद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अर्थशास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की सप्टेंबर महिन्यच्या अखेरच्या आठवड्यामध्ये राज्य बेरोजगारीच्या लाभाच्या नव्या दाव्यांमध्ये ८ टक्के वाढ होइल.