OpenAI ने विकसित केलेले ChatGpt आणि त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील आपले Bard AI लॉन्च केले आहे. Chatgpt हा एक कृत्रिम chatbot आहे. मायक्रोसॉफ्टने chatgpt तर गुगलने Bard विकसित केले आहे. अनेक कंपन्या आपला स्वतःचा chatbot विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आता Google च्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने भगवद्गीतेवर एक Gita GPT AI चॅटबॉट विकसित केला आहे. गीता चॅटबॉटच्या मदतीने वापरकर्ते आपल्या दैनंदिन समस्यांबाबत गीतेचा सल्ला घेऊ शकणार आहेत. म्हणजेच वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर जे काही प्रश्न विचारतील त्याचे उत्तर AI चॅटबॉट भगवद्गीतेच्या मदतीने देणार आहे. Gita GPT हा सुद्धा एक चॅटजीपीटीसारखा AI Chatbot आहे.
हेही वाचा : ChatGPT बाबत Google Search चे प्रमुख प्रभाकर राघवन यांचे मोठे विधान; म्हणाले…
बेंगलोरमधील Google चे सॉफ्टवेर इंजिनिअर सुकुरु साई विनीत यांनी गीता जीपीटी विकसित केले आहे. हे भगवद्गीतेपासून प्रेरित असलेला जीपीटी आहे. विनीत हे AI च्या स्पर्धेत सहभागी होऊन चॅटजीपीटी सारखे टूल तयार केले आहे जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते. Gita GPT AI chatbot GPT-3 द्वारे समर्थित आहे, जे तुमच्या जीवनातील दैनंदिन समस्यांना थेट भगवद्गीतेमधून उत्तर देते.
OpenAI चा AI चॅटबॉट ChatGPT लाँच झाल्यापासू, AI आणि चॅटबॉटची लढाई तीव्र झाली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी देखील त्यांचे स्वतःचे AI चॅटबॉट्स लॉन्च केले आहेत. गुगलने काही दिवसांपूर्वीच AI चॅटबॉट Bard लॉन्च केले तर मायक्रोसॉफ्टने आपल्या Bing सर्च इंजिनमध्ये चॅटजीपीटी सारखी टेक्नॉलॉजी समाविष्ट केली आहे.
समस्यांवर उपायही सांगतो चॅटबॉट
OpenAI च्या GPT-3 द्वारे समर्थित गीता GPT स्वतःला क्रांतिकारी चॅटबॉट अशी ओळखते. कंपनीच्या म्हणण्यानुसार Gita GPT सह तुम्ही तुमच्या जीवनातील निर्णयांमध्ये एक सोपी , संवादात्मक मार्गाने स्पष्टता आणि अंतर्दृष्टी प्राप्त करू शकता.