Gmail Facing Issues Worldwide: शनिवार, १० डिसेंबरला जगभरातील लाखो वापरकर्त्यांचे जीमेल अकाउंट अचानक ठप्प झाले होते. जवळपास तासभर जीमेल सुविधा ठप्प होत्या. यानंतर एका तासात गूगल वर्कस्पेस डॅशबोर्डवर बिघाड झाल्याने सेवा बंद असल्याचे गूगलने मान्य केले. जीमेल काम करणे बंद झाल्यावर अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून तक्रार नोंदवली होती ज्यावर उत्तर देताना गूगलने आपली चूक मान्य करून सुधारल्याचे सांगितले होते. आता समोर येणाऱ्या माहितीनुसार, वृत्तसंस्था ANI ने अद्यापही अनेक युजर्सना जीमेल डाऊन असल्याची समस्या जाणवत असल्याचे म्हंटले आहे. . जीमेलचे मोबाईल अॅप आणि डेस्कटॉप व्हर्जन दोन्ही प्रभावित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही अहवालांनुसार, जीमेलच्या एंटरप्राइझ सेवांवरही परिणाम झाला आहे. Downdetector ने सांगितलेल्या माहितीनुसार, संपूर्ण युनायटेड किंगडममध्ये एक मोठा आउटेज झाला आहे, ज्यामुळे जगभरात गूगलच्या अनेक सेवा प्रभावित झाल्या आहेत. भारतातील अनेक वापरकर्त्यांना सुद्धा जीमेल ठप्प असल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Gmail सेवा ठप्प

गुगलने अद्याप आउटेजवर अधिकृतपणे विधान जारी केलेले नाही. प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने काही दिवसांपूर्वी, मेटा चे व्हॉट्सअॅपही असेच बंद झाले होते जगभरातील १.५ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्त्यांसह, २०२२ मध्ये सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्समध्ये जीमेलचे नाव अग्रेसर होते.