How To Send e-mail offline: वर्क फ्रॉम होमची सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काम करण्यासाठी तुम्हाला आता खुर्चीत खिळून राहायची गरज नाही. उलट मस्त फिरत तुम्ही काम करू शकता. कुठे वर्केशन प्लॅन करायचं असेल किंवा थेट लॅपटॉप बॅग उचलून गावाला निघून जायचं असेल सगळं काही आता सहज शक्य आहे. ही इंटरनेटची किमयाच अशी आहे, पण कधीतरी कुठेतरी नेटवर्कचं घोडं अडतं आणि मग सगळ्या कामाची बोंबाबोंब होते, खरंय ना? इंटरनेट नसेल तर साधा एक मेल पाठवायला सुद्धा वाट बघत पाहावी लागते. पण आता यापुढे तुम्हाला अशी चिंता करायची अजिबात गरज नाही. कारण आज आपण जीमेलच्या खास हॅक पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही विना इंटरनेट सुद्धा कोणालाही मेल करू शकता. चला तर मग..

विना इंटरनेट मेल पाठवण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप वापरून जीमेलचा ऑफलाईन मोड सुरु करता येईल. यासाठी आधी आपल्याला लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये mail.google.com हे बुकमार्क समाविष्ट करा. यानंतर…

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

हे ही वाचा: (iPhone Features: कागदावरचा मॅसेज फोनवर टाईप करत बसताय? ‘हा’ स्कॅनर सेकंदात करेल काम, जाणून घ्या स्टेप्स)

स्टेप 1: तुमच्या मोबाईल/ लॅपटॉप वर क्रोम ऍप डाउनलोड केलेला असल्याची खात्री करा. जीमेल ऑफलाईन सेटिंग मध्ये जा किंवा या लिंकवर क्लिक करा https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline .

स्टेप 2: ऑफलाईन मेल इनेबल करा. यात सेटिंगमध्ये बदल करण्याचा पर्याय देखील असतो ज्यानुसार आपण किती दिवसांचे मेल व मॅसेज एकत्र लोड करून ठेवू इच्छिता हे ठरवू शकता. यात आवश्यक बदल करून सेव्ह करा.

स्टेप 3: तुम्ही जीमेलचा इनबॉक्स तुमच्या क्रोममध्ये बुकमार्क म्हणून समाविष्ट करू शकता यासाठी इनबॉक्स उघडून ऍड्रेस बारवर असणाऱ्या स्टार चिन्हावर क्लिक करा.

वर दिलेल्या या सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही जीमेलवर इंटरनेटशिवाय मेल पाठवू, वाचू व शोधू सुद्धा शकाल. या हॅक तुमच्या सदैव नेटवर्कची समस्या असणाऱ्या मित्रमैत्रिणींसह शेअर करायला विसरू नका.

Story img Loader