आजकाल प्रत्येकाच्या तोंडावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हे नाव बसलं आहे. आपल्या रोजच्या जीवाचा एआय हळूहळू भाग होत चालले आहे. चॅटजीपीटी सारखं नवं तंत्रज्ञानही एआय आणि डीप लर्निंगवर आधारित आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचे जनक म्हणून डॉ. जेफ्री हिंटन यांची ओळख आहे. मागच्या वर्षीच त्यांनी गुगलमधून राजीनामा दिला होता. एआय तंत्रज्ञानाबाबत जगात उत्सुकता असताना हिंटन यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. या तंत्रज्ञानामुळं अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात. तसेच लोकांच्या उत्पन्नात एआयमुळे असमानता दिसू शकते. यासाठी सरकारने याच्याशी संबंधित उपाययोजना हाती घ्यावी, असे हिंटन यांनी सुचविले आहे.

हिंटन पुढे म्हणाले की, एआयमुळे कार्यक्षमता आणि संपत्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल. पण हा पैसा श्रीमंत लोकांकडे जाईल आणि ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांचे नुकसान होईल. यामुळे समाजाला जबरदस्त हानी पोहोचू शकते, असा सूचक इशारा हिंटन यांनी दिला आहे. हिंटन यांनी यावर उपाय सुचविताना म्हटले की, सरकारने वैश्विक मूलभूत वेतनासंबंधीचे काही निकष ठरवायला हवेत. त्यामुळे नोकरदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकतील.

Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Deepsea warning for America Donald Trump advice to American companies to pay more attention
‘डीपसीक’ अमेरिकेसाठी इशारा!; ट्रम्प यांची अमेरिकी कंपन्यांना अधिक लक्ष देण्याची सूचना
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
Couple commit suicide by jumping under running train
विक्रोळी रेल्वे स्थानकात युगुलाची मेल एक्स्प्रेस गाडीखाली आत्महत्या

कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते जेफ्री हिंटन

डॉ. जेफ्री हिंटन यांनी याआधीही एआयच्या धोक्यांची कल्पना दिलेली आहे. एआय चॅटबॉट्सचे काही धोके हे अत्यंत भीतीदायक असल्याचे त्यांनी म्हटले. हिंटन यांच्या मताप्रमाणे काही चॅटबॉट्स मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान बनू शकतात आणि त्यांच्याकडून इतरांचे शोषण केले जाण्याची भीती आहे.
जेफ्री हिंटन तर असेही म्हणाले की, एआय स्वतःपासूनच प्रेरणा घेऊन अधिकाधिक विकसित होऊ शकते.

‘एआय’ला वेसण हवीच..

लष्करात एआयचा वापर करण्यास विरोध

जेफ्री हिंटन यांनी लष्करात एआयचा वापर होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. माझा अंदाज आहे की, आतापासून पाच ते २० वर्षांपर्यंत एआयवर ताबा मिळविण्याच्या समस्येचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. हिंटनच्या म्हणण्यांनुसार, एआयमुळे मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आपण जैविक बुद्धिमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धिमत्ता तयार केलेली असेल. हे आपल्यासाठी अधिक चिंताजनक आहे. तसेच लोकांना मारण्याचा निर्णय एआयकडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो, अशीही भीती हिंटन यांनी व्यक्त केली.

Story img Loader