ॲप्पलने ७ सप्टेंबरला आपल्या नवीन सीरीजचे अनावरण केले होते. त्यात आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो हे नवीन फोन लाँच करण्यात आले होते. जर तुम्ही देखील आयफोनप्रेमी असाल आणि आयफोन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न असेल. तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. होय, Flipkart Big Billion Days सेल दरम्यान, आयफोन १३ आणि आयफोन १२ आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. या सेल दरम्यान, दोन जुन्या आयफोन स्मार्टफोनवर चांगली सूट मिळणार आहे, ही सूट किती असेल, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अद्याप याबद्दल सांगितले नाही, परंतु हे नक्कीच सांगितले गेले आहे की ते आयफोन १३ आणि आयफोन १२ वर आता पर्यंतची आकर्षित डील असेल.

( हे ही वाचा: Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; iPhone 13 सह अनेक वस्तू मिळतील अर्ध्या किंमतीत)

iPhone 11 देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल

आयफोन १३ आणि आयफोन १२ व्यतिरिक्त, आयफोन ११ सारखे पर्याय देखील या Flipkart सेल दरम्यान उपलब्ध आहेत. दरवर्षी आपला लेटेस्ट आयफोन लाँच केल्यानंतर कंपनी जुन्या मॉडेल्सच्या किमतीत कपात करते आणि आता ही सूट अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते.

फ्लिपकार्टच्या विक्रीशिवाय, Amazon देखील भारतात सेल सुरू करणार आहे. ही दोन्ही विक्री २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दरम्यान, Realme, Redmi, Samsung आणि Poco सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल.

Story img Loader