विमानाचा प्रवास हा महाग असला तरी तो आरामदायी आणि वेळ वाचवणारा असतो. त्यामुळे हल्ली अनेकजण आपला महत्वाचा वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, विमान प्रवासादरम्यान सर्व लोकांना एकाच अडचणीला सामोरं जावे लागते. ते म्हणजे, विमानातून प्रवास करत असताना आपणाला मोबाईल वापरता येत नाही. कारण विमानात बसताच आपणाला मोबाईल Airplane Mode वर टाकावा लागतो.

प्रवासादरम्यान, आपणाला मोबाईलद्वारे कोणाशी महत्वाचा संवाद साधायचा असेल तर तो फ्लाईट मोडमुळे साधता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना फ्लाईट मोडमुळे प्रवासाचा कंटाळा येतो. मात्र, आता विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, तुम्ही विमात प्रवासातही इंटरनेटचा वापरु शकणार आहात. त्यामुळे आता तुम्हाला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा लागणार नाही. शिवाय तुम्ही या प्रवासात हवं ते पाहू शकता, तुमच्या जवळच्या व्यक्तींशी विमानातून संपर्क साधू शकणार आहात.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
Apple smart doorbell camera uses Face ID to unlock your door
Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार
Image of an airplane
Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…
mh 370 flight
१० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?

हेही वाचा- विमानतळाजवळ राहणाऱ्यांना उशिरा मिळू शकते 5G सेवा

 युरोपियन कमिशनने दिली माहिती –

याबाबत युरोपियन कमिशनने माहिती दिली असून, आम्ही फ्लाईट मोडचा नियम काढण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच विमानांसाठी 5G फ्रिक्वेन्सी बँड ३० जून २०२३ पर्यंत उपलब्ध करुन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता विमान प्रवासादरम्यान, प्रवाशांना त्याच्या मोबाईलचा पुरेपुर वापर करता येणार आहे. त्यामध्ये ते ऑनलाईन गाणी ऐकणं, व्हिडीओ पाहण्यासह कॉल मेसेजही करु शकतात. युरोपियन कमिशनच्या या निर्णयामुळे विमान प्रवास आणखी आनंददायी होणार याच शंका नाही. दरम्यान, याआधी विमान प्रवासादरम्यान तुम्हाला तुमचा मोबाईल Airplane Mode वर का टाकावा लागायचा जाणून घेऊयात.

मोबाईल फ्लाईट मोडवर का ठेवतात ?

हेही वाचा- Jio, Airtel, Vi ग्राहकांसाठी महत्वाची बातमी: नवीन सिम कार्ड २४ तासांसाठी राहणार बंद; कारण आलं समोर

विमान प्रवासादरम्या, विमानचालक आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संभाषण हे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे होते. एका संशोधनानुसार आपण वापरत असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं विमान संप्रेषण आणि नेव्हिगेशन प्रणाली सारखीच Frequency Signal सोडू शकतात. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांमुळे नियंत्रण कक्षाशी होणाऱ्या संभाषणात अडथळा निर्माण होऊ शकतो. शिवाय मोबाईल नेटवर्क आणि मोबाईल टॉवर्स हे एकमेकांशी जोडलेले असतात. प्रवाशांनी विमानात बसून मोबाईल फोन वापरले, तर नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात ताण येऊ शकतो.

हेही वाचा- पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास काय कराल? जाणून घ्या यासंबंधीचे नियम

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 5G तंत्रज्ञान. सध्याचे ५ जी वायरलेस नेटवर्क उच्च गतीच्या डेटा ट्रान्सफरसाठी बनवण्यात आले आहे. मात्र, विमान उद्योगातील अनेकांसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे. कारण 5G नेटवर्कची बॅंडविथ ही एव्हिएशन बँडविड्थ स्पेक्ट्रमच्या अगदी जवळ असते. त्यामुळे विमान लॅंडिंग करताना विमानतळाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून विमावातून प्रवास करताना तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवावा लागायाचा. पण आता लवकरच युरोपियन कमिशनच्या नव्या नियमामुळे मोबाईल फ्लाईटवर ठेवण्याची पद्धत भूतकाळात जमा होणार आहे.

Story img Loader