गूगलकडुन एक नवे गिफ्ट जाहीर करण्यात आले आहे. हे गिफ्ट म्हणजे प्ले पॉइंट हा रिवॉर्ड प्रोग्राम आहे. यामध्ये युजर्सना अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर काही रिवॉर्ड पॉईंट देण्यात येतील. या रिवॉर्ड पॉईंटमधून युजर्स पेड अ‍ॅप्स मोफत डाउनलोड करू शकतील. मागच्या काही वर्षांपासून गूगलने २८ देशांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. सध्या १०० मिलिअन लोक या प्रोग्रॅमचा लाभ घेत आहेत. लवकरच हा प्रोग्रॅम भारतीय युजर्ससाठी सुरू करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसे व्हायचे यात सहभागी

  • गूगल प्ले पॉइंट हा रिवॉर्ड प्रोग्राममध्ये ४ लेवल असणार आहेत.
  • यात सहभागी होण्यासाठी युजर्सना एखादे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल.
  • त्यामुळे त्यांना काही पॉईंट्स मिळतील. यामध्ये इन अ‍ॅप आयटम, सब्सक्रीप्शन, अ‍ॅप्स, गेम्स यांचा समावेश आहे.
  • युजर्स हे पॉईंट्स गूगल प्ले क्रेडिटच्या माध्यमातून स्टोरमध्ये वापरू शकतील.
  • ‘गूगल प्ले’कडुन पॉप्युलर अ‍ॅप्स आणि गेम्ससाठी जगभरातील अनेक डेव्हलपर्सशी पार्टनरशिप करण्यात आली आहे.
  • यामुळे युजर्स अ‍ॅप्स आयटम रिडीम करू शकतील.
  • यामध्ये सहभागी होण्यासाठी प्ले स्टोर अ‍ॅप उघडा.
  • त्यातील उजव्या बाजुला असणाऱ्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
  • त्यानंतर प्ले पॉईंट्सवर क्लिककरून यामध्ये सहभागी व्हा.

या डेवलपर्स सोबत झाली पार्टनरशिप

  • टीजी आयएनसी (एवनी : द किंग रिटर्न)
  • गेमेशन (लुडो किंग)
  • प्लेसिम्पल गेम्स (वर्ड ट्रिप )
  • गेमबेरी लॅब्स (लुडो स्टार )
  • ट्रूकॉलर
  • वायसा
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Googel launches play point reward programme know how to enroll pns