गुगल प्ले स्टोर आपल्या युजर्ससाठी एक नवे आणि महत्त्वपूर्ण फीचर घेऊन आले आहे. हे फीचर वापरकर्त्यांना कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना, या अ‍ॅपद्वारे कोणती माहिती संकलित केली जात आहे हे सांगणार आहे. गुगल प्ले स्टोरच्या आधी, अ‍ॅप्पलने त्याच्या प्ले स्टोरवर असेच एक फीचर आणले होते, जे प्रायव्हसी न्यूट्रिशन लेबनसारखे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुगल प्ले स्टोअरचे डेटा सेफ्टी सेक्शन फीचर फक्त अँड्रॉइड यूजर्ससाठी आहे. यासाठी गुगलने सर्व अ‍ॅप डेव्हलपर्सना २० जुलै २०२२ पर्यंत डेटा सुरक्षा सेक्शन पूर्ण करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, ज्या अ‍ॅप्ससाठी तुम्हाला डेटा सेफ्टी सेक्शन अद्याप दिसत नसेल, तर ते येणाऱ्या काही आठवड्यात दिसायला लागतील.

ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पहिलं ट्विट काय होतं माहित आहे? वाचा…

अ‍ॅप डेव्हलपर्सना सूचना देताना गुगलने म्हटले आहे की, ‘अ‍ॅपच्या कामामध्ये कधी काही बदल झाला असेल तर ते डेटा सेफ्टी सेक्शनमध्येही अपडेट करावे लागेल, जेणेकरून युजर्सना अ‍ॅपमधील बदलांची पूर्ण माहिती असेल.’

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहले की ‘वास्तविक युजर्सना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांचा डेटा कोणत्या उद्देशाने गोळा केला जात आहे आणि डेव्हलपर्स त्यांचा हा डेटा तृतीय पक्षांसोबत तर शेअर करत नाहीत ना? याशिवाय, युजर्सना हे देखील समजून घ्यायचे आहे की अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर अ‍ॅप डेव्हलपर्स त्यांचा डेटा कसा सुरक्षित करत आहेत. म्हणूनच आम्ही डेटा संरक्षण विभाग तयार केला आहे जेणेकरून डेव्हलपर्स स्पष्टपणे सांगू शकतील की कोणता डेटा गोळा केला जात आहे आणि कोणत्या उद्देशाने?’

कडाक्याच्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी आजच घरी आणा हा पोर्टेबल AC; पंख्याच्या किमतीमध्ये देईल थंड हवा

गुगलने अँड्रॉइड १२ सह प्रायव्हसी फीचर्समध्ये अनेक प्रभावी बदलांची घोषणा केली होती. गुगल प्ले स्टोरवर आणलेला हा नवीन डेटा सुरक्षा विभाग देखील युजर्सची डेटा प्रायव्हसी अधिक सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. अँडॉईड १२ च्या युजर्सना अ‍ॅपतर्फे स्मार्टफोनच्या वरच्या कोपऱ्यात कॅमेरा आणि माईक दिसेल, जे सांगेल की डिव्हाइस कॅमेरा आणि माईक वापरत आहे किंवा नाही.