गुगलची लोकप्रिय ईमेल सेवा जीमेलचा वापर जगभरात सर्वाधिक केला जातो. ऑफिसमधील प्रत्येक कामासाठी खासकरून गुगलच्या याच ईमेल सेवेचा वापर केला जातो. आता गुगलने जीमेल आणि गुगल चॅट्स वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. गुगलने तीन नवीन फीचर्सची घोषणा केली असून या फीचर्सच्या मदतीने यूजर्सना वेब आणि मोबाईलवर चांगला सर्च अनुभव मिळणार आहे.
कंपनीच्या मते, या फीचर्सच्या मदतीने वापरकर्त्यांना अधिक अचूक आणि कस्टमाइज्ड सर्च सिलेक्शन आणि रिझल्ट मिळतील. नवीन वैशिष्ट्यांच्या सूचीमध्ये शोध सूचना, जीमेल लेबल आणि संबंधित परिणामांचा समावेश आहे. सध्या, ही वैशिष्ट्ये सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केलेली नसून हे फक्त काही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि येत्या काही दिवसांत त्यांचा विस्तार केला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. चला जाणून घेऊया गुगलचे कोणते आहेत हे नवीन फीचर्स…
आणखी वाचा : खुशखबर : आता OnePlus वापरकर्त्यांना घेता येणार 5G इंटरनेट स्पीडचा आनंद
गुगलने तीन नवीन फीचर्स
गुगलने तीन नवीन फीचर्स जारी केले आहेत. हे तिन्ही फीचर्स सर्व Google Workplace ग्राहक, G Suite Basic आणि Business वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. Google चॅट शोध सूचना वैशिष्ट्य आधीपासूनच Android डिव्हाइसवर उपलब्ध आहे आणि ऑक्टोबरच्या अखेरीस iOS वापरकर्त्यांसाठी आणले जाणार आहेत.
नवीन फीचर्सचे फायदे
- नवीन जीमेल आणि चॅट फीचर्स वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चॅटची शोध सूचना वैशिष्ट्ये वापरकर्त्यांच्या मागील शोध इतिहासावर आधारित शोध क्वेरी सुचवतील. म्हणजेच, तुम्ही एखादी गोष्ट टाइप करताच, तुम्हाला चॅट सर्च बारमध्ये त्याच्याशी संबंधित सूचना मिळू लागतील. याच्या मदतीने युजर्स महत्त्वाचे मेसेज, फाइल्स पुन्हा पाहू शकतात.
- जीमेल लेबल वैशिष्ट्य Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर वेब यूजर्ससाठीही उपलब्ध होऊ शकते. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते विशिष्ट जीमेल लेबलखाली मेसेज शोधू शकतात.
- संबंधित परिणाम वैशिष्ट्ये हे मोबाईल अॅपवर जोडले जातील. हे वैशिष्ट्य जीमेल शोध क्वेरीसाठी आहे. तुम्ही जीमेलवर काहीतरी शोधताच, ते संबंधित परिणाम देखील दर्शवतील.