Google ने आपल्या नवीन Android 14 ला पिक्सल फोनमध्ये डेव्हलपर प्रिव्ह्यूसाठी जारी केले आहे. सध्या हे नवीन अँड्रॉइड Pixel ७ ,Pixel 6a, Pixel 5, Pixel 5aआणि Pixel 4a सह अन्य पिक्सल फोनसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. नवीन अँड्रॉइडमध्ये जबरदस्त इंटरफेस स्पीड , जबरदस्त ताकद आणि सिक्युरिटी फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत.
गुगलच्या अँड्रॉइड डेव्हलपर पेजवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार , नवीन Android १४ डेव्हलपर प्रिव्हयु इमेज मध्ये अनेक पिक्सल डिव्हाईस उपलब्ध आहेत. यामध्ये Pixel ७ सिरीजच्या च्या वॅनिला व्हेरिएंट आणि pixel 7 Pro सह Pixel 6 आणि Pixel 6 Pro, Pixel 6a, Pixel 5 सिरीज आणि Pixel 5a आणि Pixel 4a याचाही समावेश आहे. वापरकर्ते अँड्रॉइड फ्लॅश टूल चा वापर करून मॅन्युअलमध्ये इन्स्टॉल करू शकतात.
Android 14 मध्ये मिळणार हे फीचर्स
डेव्हलपर प्रिव्हयुनुसार नवीन अँड्रॉइडला जबरदस्त इंटरफेस स्पीड , ताकद आणि सिक्युरिटी आणि प्रायव्हसी असे फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत. याचे बॅकग्राउंड अॅप ऑप्टिमायझेशन देखील सुधारण्यात आले आहे ज्यामुळे फोनचा स्पीड अधिक वाढतो. नवीन Android अपडेट २०० टक्क्यांपर्यंत नॉन-लिनियर स्केलिंगसह मोठे फॉन्ट आणू शकते जे सध्या Pixel फोनसाठी १३० टक्के इतके आहे. वापरकर्ता डेव्हलपर – सेटिंग- अॅक्सेसिबिलिटी- डिस्प्लेचा आकार आणि टेक्स्ट सेटिंग निवडून त्याचे टेस्टिंग करू शकतात.
नवीन ऑपरेटिंग सिस्टीम बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅपद्वारे बॅटरीचे ऑप्टिमायझेशन देखील सुनिश्चित करणार आहे. न वापरलेले अॅप फोनची बॅटरी वापरण्यापासून हे अँड्रॉइड रोखेल. याव्यतिरिक्त हे नवीन अपडेट फाईल्स डाउनलोड करताना बॅकग्राउंड ताकदीचा कमी वापर करण्याची परवानगी देईल.