आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर आपण सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतो. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात. याच google ने आपल्या Google Docs, Gmail, Sheets, Slides, Meet आणि Chat यासह त्याच्या वर्कस्पेस अॅप्ससाठी नवीन जनरेटीव्ह AI फीचर्सची घोषणा केली आहे.
नवीन AI फीचर्ससह वापरकर्ते आपल्या जीमेलचे कॉन्ट्रॅक्ट तयार करणे, मेलला उत्तर देणे यासाठी सक्षम असणार आहे. तसेच गुगल डॉक्समध्ये वापरकर्त्यांना विचार करणे, प्रूफरिडींग करणे अणि लिखाण देखील करता येणार आहे. त्या शिवाय गुगल शीट्समध्ये वापरकर्ते रॉ डेटापासून विश्लेषण करू शकणार आहेत. तर गुगल Meet मध्ये नोट्स मिळवणे आणि नवीन बॅकग्राऊंड जनरेट करू शकतील. चॅटमध्ये AI फीचर्स वापरकर्त्यांसाठी काम करण्यासाठी कार्यप्रवाह अधिक सक्षम करतील.
आम्ही या महिन्यामध्ये आमच्या प्रोग्रॅमच्या माध्यमातून हे नवीन फीचर्स लॉन्च करू. ज्याची सुरुवात अमेरिकेमध्ये इंग्रजीमधून होईल. तेथून आम्ही अधिक देशांमध्ये आणि भाषांमध्ये वापरकर्त्यांना, लहान व्यवसायांना, उद्योगांना आणि शिक्षण संस्थांना अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याआधी अनुभवाची पुनरावृत्ती करू असे गुगलने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे.