गुगलची जीमेल सेवा जगभरातील कोट्यवधी लोकं वापरतात. संवाद साधण्यासाठी जीमेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता लोकप्रिय Gmail लवकरच नव्या रंगात नव्या ढंगात येणार असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. गुगल वर्कस्पेससाठी नवीन योजनांचा भाग म्हणून रिडिजाईन केलं आहे. जीमेलमध्ये गुगल चॅट, मीट आणि स्पेसेस जवळ येतील. २०२२-२३ या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहित सर्वांना नवं जीमेल वापरता येणार आहे. याचाच अर्थ जूनपासून नव्या रुपातील जीमेल वापरता येणार आहे. पण युजर्स ८ फेब्रुवारीपासून नवीन इंटिग्रेटेड व्ह्यूची चाचणी करु शकतात. नवीन लेआउट वापरकर्त्यांना जीमेलसाठी एकच एकत्रित लेआउट ऐवजी मेल, चॅट, स्पेसेस आणि मीट या चार बटणांमध्ये स्विच करण्याचा पर्याय देईल.
नवीन लेआउट अंतर्गत, वापरकर्त्यांना Google च्या बिझनेस फोकस वर्कस्पेस सूटसह इतर मॅसेजिंग टूलचा सहज वापर करता येईल. जीमेलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र स्क्रीन किंवा टॅब देखील असू शकतो. या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी, नवीन लेआउट अंतर्गत, Gmail च्या होम स्क्रीनच्या डाव्या बाजूला मोठी बटणे आढळतील. गुगलने माहिती देताना सांगितले की, युजर्स नव्या लेआउटवर स्विच व्हावे यासाठी एक नोटीफिकेशन मिळेल. जर नवीन लेआउट पर्याय एप्रिल महिन्यापर्यंत निवडला नाही, तर तो आपोआप नवीन लेआउटमध्ये बदलला जाईल, जेणेकरून युजर्संना नवीन फिचर्स मिळतील.
गुगलने आपल्या नवीन लेआउटबद्दल बोलताना सांगितले की, ते वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये, महत्त्वपूर्ण संभाषणांमध्ये सहजपणे स्विच करण्यास अनुमती देईल. तसेच, तुम्ही नवीन विंडो न उघडता मीटिंगमध्ये सामील होऊ शकता.