इंटरनेटवर माहिती सर्च करण्यासाठी जगात गुगल क्रोम ब्राऊजरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे ब्राऊजर वापरण्यास सोपी असून त्यातील अनेक फीचर्स वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतात. दरम्यान क्रोम ब्राऊजर वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. गुगलने क्रोम वापरकर्त्यांना मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे. गुगल एका बग बाबत वापरकर्त्यांना सतर्क करत असून , तो उपकरणासाठी हानीकारक असल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे सीव्हीई – २०२२ – ३७२३?

अवास्टच्या सुरक्षा संशोधकांनुसार, सीव्हीई – २०२२ – ३७२३ हे क्रोमच्या व्ही ८ जावा स्क्रिप्ट इंजिनशी संबंधित टाईप कन्फ्युजन समस्या आहे. हानी पोहचवू इच्छिणारी व्यक्ती आर्बिटरी कोड मिळवण्यासाठी वापरकर्त्याच्या डिव्हाइसमधील टाईप कन्फ्युजन त्रुटीचा फायदा घेऊ शकते. आर्बिटरी कोडच्या मदतीने वापरकर्त्याच्या सिस्टिममध्ये प्रवेश मिळवता येते.

(चुकीच्या पत्त्यावर ईमेल गेलाय? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून परत मिळेल ईमेल)

क्रोम युजर्सनी काय करावे?

गुगलने यावर उपाय शोधला आहे. हानीकारक बगपासून सुरक्षेसाठी कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे आवाहन केले जात आहे. गुगलने अलिकडेच क्रोम १०७ अपडेट उपलब्ध केला आहे. क्रोम ब्राऊजर अपडेट केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

गुगल क्रोम कसे अपडेट करावे?

गुगल क्रोम ब्राऊजर अपडेट करण्यासाठी क्रोम पेजच्या वरच्या भागात उजव्या बाजूला असलेल्या ३ डॉट्सवर क्लिक करा. यात सेटिंग्सवर क्लिक करा. त्यानंतर उजव्या बाजूला ‘लुक फॉर अबाऊट क्रोम’ हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. याने नवीन अपडेट उपलब्ध आहे की नाही याबाबत कळेल. अपडेट उपलब्ध असल्यास त्यावर क्लिक करा.