Google Assistant Replaced By AI powered Gemini : गुगल असिस्टंटने लाखो स्मार्ट डिव्हाइस युजर्सचे जीवन सोपे केले आहे. हे युजर्सना हँड्सफ्री पद्धतीने अनेक कामे करण्याची मोकळीक देते, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे सोपे होते. या कामांमध्ये रोबोट व्हॅक्यूम क्लिनर नियंत्रित करणे, दिवे बंद करणे यासारख्या दैनंदिन कामांचा समावेश होतो. पण, आता गूगलने सर्व युजर्सना धक्का दिला आहे. गुगल असिस्टंटची जागा आता जेमिनी घेणार आहे.

२०१६ मध्ये अँड्रॉइडसाठी लाँच केलेला डिजिटल असिस्टंट, ‘गुगल असिस्टंट’ लवकरच गुगल ग्रेव्हयार्डमध्ये सामील होणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये, गुगलने जाहीर केले की, जवळजवळ अनेक दशक जुने डिजिटल असिस्टंट लवकरच जनरेटिव्ह एआय पॉवर्ड जेमिनीमध्ये बदलले (रिप्लेस) जाईल.

टेक जायंट म्हणतात की, लाखो लोकांनी आधीच गुगल असिस्टंटवरून जेमिनीमध्ये स्विच केले आहे. त्यामुळे हे बघता या वर्षाच्या अखेरीस जुना डिजिटल असिस्टंट तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नसेल. स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, टॅब्लेट, कार, हेडफोन्स आणि स्मार्टवॉच सारखी उपकरणे देखील जेमिनीमध्ये बदलली जातील . जोपर्यंत हा बदल होत नाही तोपर्यंत, ही उपकरणे गुगल असिस्टंटसह काम करत राहतील. पण, कंपनीने अद्याप या उपकरणांवर जेमिनी कसे काम करेल याबद्दल कोणतीही माहिती शेअर केली नाही.

गूगल असिस्टंटला जेमिनी एआयमध्ये कसे स्विच करावे?

जर तुम्ही अजूनही गुगल असिस्टंटवरून जेमिनीवर स्विच केले नसेल, तर फक्त गुगल प्ले स्टोअर वरून जेमिनी अ‍ॅप डाउनलोड करा. काही टॅप्समध्ये तुम्ही नवीन एआय पॉवर्ड असिस्टंट वर स्विच करू शकाल. गेल्या काही महिन्यांत, गुगलने जेमिनीमध्ये अनेक असिस्टंट फीचर्स पोर्ट केले आहेत, जसे की, म्युजिक प्ले करण्याची क्षमता, लॉक स्क्रीनवरून काही फंक्शन नियंत्रित करणे आणि टायमर सेट करणे आदी.

पण, काही निवडक फंक्शन अद्याप जेमिनीमध्ये नाही आहेत, ज्यामुळे गुगलला त्यांचे जुने डिजिटल असिस्टंट बंद करण्यासाठी काही महिने लागतील हे एक कारण असू शकते. जेमिनीच्या बाजूने गुगल असिस्टंट बंद करण्याची कंपनीची घोषणा आश्चर्यकारक नाही, कारण टेक जायंटने पिक्सेल ९ सिरीजसह जेमिनी डीफॉल्ट व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून लाँच केली आहे.

Story img Loader