Twitter एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्याचे सीईओ एलॉन मस्क आहेत. ट्विटरने आता ब्ल्यू टिक साठी पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामने देखील वापरकर्त्यांसाठी ब्लू टिक ची घोषणा केली आहे. आता गूगलने देखील वापरकर्त्यांना ब्लू टिक देण्याची घोषणा केली आहे. अर्थात गुगल सध्या Gmail वापरकर्त्यांना ही सुविधा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुगलचे असे म्हणणे आहे, ब्लू टिक वरून ईमेल पाठवणाऱ्या वापरकर्त्यांची योग्य ओळख होणार आहे. तसेच फ्रॉड ईमेल आयडीवरून पाठवण्यात आलेला मेसेज वापरकर्ते सहज ओळखू शकणार आहेत. हे फिचर गुगलने आणले आहे . हे Google Workspace, G Suite Basic आणि Business च्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहे.

हेही वाचा : Weekly Tech Updates: Samsung कडून ChatGpt बॅन ते भारतात १४ अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

ब्लू टिक सर्व्हिस लवकरच पर्सनल google अकाउंट असणाऱ्यांना पण दिली जाणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या गुगलने आपली ही सेवा मोफत ठेवली आहे. ट्विटरप्रमाणे गुगल यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही आहे. सध्या कंपन्यांना ब्लू टिक सेवा दिली जात आहे. याचा फायदा त्याच कंपन्यांना होणार आहे ज्यांनी ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन (BIMI) हे फिचर घेतले आहे. या फिचर वापर करणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा ऑटोमॅटिक मिळणार आहे.

गुगल ब्लू टिक सेवा सर्वांसाठी टप्याटप्प्याने सुरु करणार आहे. कंपन्यांना ही सुविधा मिळाल्यांनतर प्रसिद्ध सेलिब्रेटी, माध्यमकर्मी आणि इतरांसाठी ब्लू टिक जारी करण्यात येणार आहे. या सेवेसाठी वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट व्हेरीफाईड करावे लागणार आहे. ही ब्लू टिक सेवा अगदी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखी असेल.

हेही वाचा : मस्तच! आता सहज डाउनलोड करता येणार Instagram रिल्स; थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज नाही, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ट्विटर आणि मेटा आकारत आहे शुल्क

twitter ने अलीकडेच वापरकर्त्यांची blue tick हटविली होती. तसेच ज्यांना ब्लू टिक हवी असेल त्यांना आता ट्विटरवर पेड सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. म्हणजेच ब्लू टिकला पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटर व्यतिरिक्त, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील पेड सब्स्क्रिप्शन सर्व्हिस लॉन्च केली आहे. याला मेटा व्हेरिफाईड म्हटले जाते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google blue tick service for gmail afert twitter and instagram facebook not paid subscription tmb 01