Google Search AI Features : आज असंख्य लोक ऑनलाइन माहिती घेण्यासाठी गूगलचा वापर करत आहेत. हे सर्च इंजिन इंटरनेटवर गेली अनेकवर्षे आघाडीवर आहे. असे असताना, हे टेक जायंट आता जेमिनी फीचरवर कार्यरत असणाऱ्या AI च्या मदतीने सर्च केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारे फीचर वापरकर्त्यांसाठी आणलेले आहे.

काही महिन्यांपूर्वी गूगलने सर्च जनरेटिव्ह एक्स्पिरियन्स (SGE) हे प्रायोगिक फीचर सादर केले होते. परंतु, आता हे जमिनी फीचरच्या साथीने काम करणारे तंत्रज्ञान प्रत्येकासाठी उपलब्ध असल्याचे समजते.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO

आता हे जेमिनी मॉडेल, तुम्ही गूगलवर शोधलेल्या गोष्टींची माहिती, AI-चॅटबॉटच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला हवी असणारी माहिती एकत्र करून तुम्हाला देण्यासाठी सक्षम असेल.

हेही वाचा : बायकोच्या ‘या’ सल्ल्यामुळे, Google चे सीईओ आज दिवसाला कमवतात तब्ब्ल पाच कोटी रुपये! पाहा

आतापर्यंत AI ओव्हरव्ह्यू फीचर हे स्वयंचलितपणे निर्माण केले जायचे. परंतु, लवकरच सर्च लॅबमधील अपडेट वापरकर्त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार, अधिक सोप्या भाषेत आणि तपशीलवार माहिती देण्याचे काम करेल, असे गूगल सांगते. जे वापरकर्ते अमेरिकेतून याचा वापर करतील, त्यांच्यासाठी केवळ इंग्रजी भाषा उपलब्ध असेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषयाबद्दल काही जाणून घ्यायचे असल्यास, माहिती गोळा करायची असल्यास अथवा लहान मुलांना माहिती समजवण्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय सोपे ठरणार आहे.

याव्यतिरिक्त अजून एक मजेदार आणि उपयुक्त फीचर AI ओव्हरव्ह्यूजमध्ये येणार आहे. ते म्हणजे गूगल सर्चला ‘काहीतरी ‘प्लॅन’ करण्यासाठी’ वापरकर्त्यांना सांगता येऊ शकते. वापरकर्त्यांना लवकरच, “३ दिवसांच्या आणि बनवण्यास सोप्या असणाऱ्या स्वयंपाकाची योजना तयार करा” असे सांगता येईल. असे सांगितल्यानंतर, गूगल तुम्हाला विविध रेसिपी वेगवेगळ्या ठिकाणांहून दाखवेल. असे क्लिष्ट प्रश्न, शंका तुमच्या प्राध्यान्यानुसार तुम्ही कस्टमाइजदेखील करू शकता.

हेही वाचा : गूगलचे ‘Google wallet’ नेमके आहे तरी काय? कोणते अँड्रॉइड वापरकर्ते घेऊ शकतात याचा लाभ?

गूगल अजून एक फीचरसुद्धा वापरकर्त्यांसाठी आणणार असल्याचे समजते, ज्यामध्ये AI आपोआप सर्च पेज व्यवस्थापित करण्याचे काम करू शकते. सुरुवातीला हे फीचर जेवण आणि रेसिपी यांसाठी कार्यक्षम असेल. त्याच्या जोडीला चित्रपट, पुस्तके, हॉटेल्स, संगीत, खरेदी आणि इतर अनेक गोष्टींची जोड नंतर करण्यात येईल. इतकेच नाही, तर लवकरच वापरकर्ते व्हिडीओच्या माध्यमातूनदेखील सर्च करण्यास सक्षम असतील. इतर वैशिष्ट्यांप्रमाणेच हे फीचर्सदेखील अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी इंग्रजी भाषेत सर्च लॅब्समध्ये उपलब्ध असेल. मात्र, कालांतराने इतर देशांमध्येदेखील याचा विस्तार करण्यात येईल.

Story img Loader