Google CEO Sundar Pichai Advice : जेव्हा आपण तंत्रज्ञान आणि त्याच्या प्रगतीबद्दल बोलतो, तेव्हा बहुतेक लोकांना असे वाटते की, तंत्रज्ञान जग केवळ प्रोग्रामिंग आणि इंजिनिअरिंगवर चालते. मात्र, तंत्रज्ञान उद्योग केवळ सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या बळावरच उभा नाही तर तो विविध विभागांच्या कौशल्यावर उभा आहे. नवीन पिढीने केवळ प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकी सारख्या पारंपरिक विभागांशिवाय इतर संधींचा विचार करण्याचा सल्ला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिला. ते गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये बोलत होते.
(व्यक्तीने ऑर्डर केला १ लाख २० हजारांचा Macbook Pro, हाती जे आलं ते पाहून म्हणाला, “पुन्हा…”)
गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये पिचाई भारतात चालू असलेल्या तांत्रिक प्रगतीबद्दल बोलले आणि देश कसा विकसित होत आहे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मोठे केंद्र बनत आहे, याची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी तंत्रज्ञान क्षेत्रात शिरू पाहणाऱ्या नवीन लोकांना काय सल्ला द्याल, असे विचारले असता, तंत्रज्ञान हे मोठे क्षेत्र आहे, ते केवळ प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकी नाही. तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशपणे विचार करणे आवश्यक आहे, ते इतरांसाठीही संधी निर्माण करण्यात मदत करेल, असे ते म्हणाले.
यावेळी पिचाई यांनी अनेक उत्पादने, प्रकल्प आणि ‘एआय’वर आधारित उपयांची घोषणा केली जी लवकरच भारतात लाँच केली जातील. पिचाई यांनी भारताच्या वेगवान तंत्रज्ञान मोहिमेची प्रशंसा केली आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीय ब्रँडसह नवीन भागीदारी करणार असल्याची घोषणा केली.
तुम्हाला हवं ते शोधण्यासाठी संपूर्ण Youtube Video पाहण्याची गरज नाही
गुगलने नवी दिल्ली येथील गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये अनेक मनोरंजक फीचर्सची घोषणा केली आहे. प्रेस्क्रिप्शनवरील डॉक्टारांचे हस्तलिखित ओळखण्यासाठी गुगल मदत करणार असून अँड्रॉइड फोनमध्ये प्री इन्स्टॉल डिजिलॉकर सेवा उपलब्ध करणार असल्याचे देखील गुगलने म्हटले आहे. त्यापैकी सर्वात लक्ष वेधणारे फीचर म्हणजे यूट्यूब व्हिडिओमध्ये विशिष्ट क्षण शोधता येणे. हे फीचर सध्या बिटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून त्याची चाचणी केली जात आहे.
‘या’ 5 भन्नाट ट्रिक्स लक्षात ठेवा, Whatsapp वापरताना भरपूर कामी येतील
या फीचरद्वारे युजरला यूट्यूब व्हिडिओतील एखादी गोष्ट किंवा ठिकाण किंवा विशिष्ट क्षण शोधता येईल. उदाहरणार्थ तुम्ही जर हैदराबाद संबंधी व्हिडिओ पाहात असाल आणि तुम्हाला केवळ त्यातील चारमिनार आणि त्याचा परिसर पाहायचा असेल तर तुम्हाला केवळ व्हिडिओ खालील व्हिडिओ पर्यायातील सर्च या बटनीवर क्लिक करून त्यात केवळ चारमिनार टाकावे लागेल. या फीचरमुळे यूट्यूब व्हिडिओतील एखादे ठिकाण शोधण्यासाठी लागणारे परिश्रम आणि वेळ वाचेल.
सध्या गुगल या फीचरची चाचणी घेत आहे. हे फीचर लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते. आम्ही तुमच्या फोनच्या सर्च अॅपवर व्हिडिओमध्ये सर्च करण्यावर काम करत आहोत. केवळ सर्च इन व्हिडिओ पर्यायाचा वापर करून तुमचे क्विरी टाका आणि तुम्ही नेमकं काय शोधत आहात ते सर्च करा, असे गुगलने म्हटले.