सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण सगळेच इंटरनेटचा वापर करतो. त्यासाठी गुगल क्रोम आणि गुगल ब्राउझर या ॲपच्या सर्च बारमध्ये क्लिक करून तुम्ही विविध विषयांचे प्रकल्प, कोणत्या ठिकाणी कमी किंमतीत फार्महाऊस मिळेल आदी बऱ्याच काही गोष्टींची माहिती आपण सहज मिळवू शकतो. पण, अनेकदा असे होते की, आपण गुगल क्रोमवर एकाच वेळी अनेक टॅब चालू करतो. त्यामुळे लॅपटॉप, संगणक हँग होण्याची आणि हे ॲप स्लो चालण्याची शक्यता जास्त असते. तर त्यासाठी गुगल क्रोमच्या सेटिंगमध्ये ‘Hardware Acceleration’ नावाचे फीचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही गुगल क्रोमचा वेग वाढवू शकता.
गुगल क्रोम सध्या उपलब्ध असलेल्या सर्वांत वेगवान आणि लोकप्रिय इंटरनेट ॲप्सपैकी एक आहे. तर ‘हार्डवेअर ॲक्सेलरेशन’ (Hardware Acceleration) नावाचे फीचर क्रोमला आणखी वेगवान बनवू शकते. वेबपेज आणि कन्टेन्ट रेंडर करण्यासाठी गुगल क्रोम तुमच्या मशीनच्या सीपीयू आणि सॉफ्टवेअरचा वापर करते. तसेच हार्डवेअर ॲक्सेलरेशन हे फीचर तुम्ही सक्षम केल्यास ब्राउझरचा परफॉर्मन्स आणि प्रतिसाद सुधारेल. तुम्ही अनेकदा बऱ्याच वेब पेजला भेट देत असल्यास किंवा ब्राउझरवर अनेक व्हिडीओ पाहत असाल, तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
हेही वाचा…ख्रिसमसला काय भेटवस्तू द्यावी सुचत नाहीय? मग प्रियजनांना भेट द्या ‘या’ गॅजेट्सपैकी काही…
गुगल क्रोममध्ये ‘Hardware Acceleration’ नावाचे फीचर enable कसे कराल ?
१. क्रोम लाँच करा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला दिसणार्या उभ्या थ्री-डॉट बटणावर क्लिक करा.
२. त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा आणि डाव्या पॅनेलवर दिसणार्या ‘सिस्टीम’ टॅबवर जा.
३. तुम्हाला पेजवर ‘Use hardware acceleration when available’ नावाचा पर्याय दिसेल; तो ऑन करा आणि क्रोम पुन्हा री-लाँच करा.
ब्राउझर पुन्हा लाँच केल्यानंतर त्याच पृष्ठावर जाऊन हार्डवेअर प्रवेग सक्षम केला आहे का याची याची खात्री करू शकता. वापरकर्ते क्रोमच्या ॲड्रेस बारमध्ये ‘chrome://gpu’ टाइप करून एंटर दाबू शकतात. फीचर सक्षम असल्यास, तुम्हाला ‘ग्राफिक फीचर स्टेटस’ सेक्शनमध्ये हिरव्या रंगाच्या मजकुरात ‘हार्डवेअर ॲक्सेलरेशन’ (hardware acceleration) दिसेल. टीप : हार्डवेअर ॲक्सेलरेशन ऑन केल्यानंतर जर क्वचित कोणाला विचित्र समस्या येत असल्याचे जाणवले किंवा ब्राउझर क्रॅश किंवा फ्रीझ होत असल्यास फीचर लगेच Disable करा.