Google chrome price drop notify feature : ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुगलचे Google Chrome browser लवकरच वस्तूंच्या किंमती घटल्यास युजर्सना सूचित करेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. यामुळे युजर्सना शॉपिंगमध्ये बचत होण्यात मदत होणार आहे. वस्तूची किंमत कमी झाली की नाही हे पाहण्यासाठी लोकांना सारखेसारखे पेज रिफ्रेश करावे लागणार नाही. वस्तूंच्या किंमत घटल्या की नाही हे माहिती करून घेण्यासाठी युजर क्रोममधून इमेल किंवा मोबाईल अलर्ट पर्याय निवडू शकतील, असे कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे.
गुगलनुसार, प्राइज ड्रॉप अलर्ट हे फीचर सध्या अमेरिकेत डेस्कटॉप आणि अँड्रॉइड डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे आणि ते क्रोम अॅड्रेस बारमध्ये ट्रॅक प्राइज निवडून सुरू करत येते. गुगलने काही नवीन फीचर्स देखील अॅड केली आहेत. क्रोम रिटेलर्सकडून उपलब्ध डिस्काउंट कोड शोधेल आणि जेव्हा युजर्स शॉपिंग कार्टमध्ये वस्तू अॅड करतील तेव्हा त्यांना आपोआप दाखवेल.
(दरीत 300 फूट खोल अंतरावर कोसळली कार, ‘Apple iphone’ने २ व्यक्तींचे असे वाचवले प्राण)
शिवाय वापरकर्त्यांना विद्यमान शॉपिंग कार्ट तपासण्याची आवश्यकता असताना ते टॅब उघडू शकतात. त्यांना उपलब्ध सूट देखील तपासता येईल. दोन्ही फीचर्स अमेरिकेत गुगल क्रोमच्या डेस्कटॉप व्हर्जनवर उपलब्ध आहेत. गुगल क्रोम डेस्कटॉपचा वापर करून परिणाम पॅनलच्या बाजूला मिळवण्यासाठी युजर इमेजवर राइट क्लिक करून गुगल लेन्सच्या सहायाने तिला शोधू शकतात.
परिणाम किरकोळ विक्रेत्यांकडील पर्याय आणि युजरच्या बजेटमध्ये बसणाऱ्या किंमतीप्रमाणेच दिसतील. वस्तू स्टॉकमध्ये आहे किंवा बॅकऑर्डर केलेली आहे हे देखील दिसून येईल. ब्राऊजर माहिती भरताना युजरचा वेळ देखील वाचवेल. ब्राऊजर आधी सेव्ह केलेला डेटा जसे युजरचा अॅड्रेस किंवा गुगल प्लेवरील पेमेंट डिटेल याद्वारे आपोआप माहिती भरेल.