हल्लीच्या काळामध्ये स्मार्टफोन हे मानवाचे अत्यंत महत्वाचे साधन बनले आहे. लोकं अँड्रॉइड आणि iOs असे दोन प्रकारचे फोन वापरतात. Google ने Android डिव्हाईससाठी नवीन साइन-अप पर्यायासाठी Passkey चा सपोर्ट जारी केला आहे. हे फिचर याआधी पर्सनल अकाउंटसाठी अतिरिक्त साइन इनचा पर्याय म्हणून लॉन्च करण्यात आले होते.
काय आहे Passkey फिचर ?
मात्र आता या फीचरला वर्कस्पेस अकाउंट आणि गुगल क्लाउड अकाउंटसाठी देखील लॉन्च करण्यात आले आहे. आता या फीचरच्या मदतीने पासवर्ड न टाकता लॉग इन करता येते. Passkey एक युनिक डिजिटल आयडेंटिटी आहे जी आपल्या डिव्हाईस स्टोअर असते. पास-की फीचर हे पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित आहे आणि वापरण्यासाठी देखील सोपे आहे. याबाबतचे वृत्त news18.com ने दिले आहे.
पास-की हे फिचर केवळ पासवर्डची जागा घेते. आणि वापरकर्त्यांना पिन, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकसह Apps आणि वेबसाईटमध्ये साइन इन करण्याची परवानगी देते. गुगलच्या म्हणण्यानुसार, पासवर्डरहित साइन इन मेथड फिशिंग आणि अन्य सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यांचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. टेक जायंटने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले, ”ओपन बीटामध्ये ९ दशलक्षापेक्षा अधिक संस्था त्यांच्या वापरकर्त्यांना पासवर्डऐवजी पास-की फीचरचा वापर करून Google Workspace आणि Google Cloud खात्यांमध्ये साइन इन करण्याची परवानगी देऊ शकतात. ”
Magic compose beta फीचर
गुगलने चॅटजीपीटी AI चॅटबॉटला टक्कर देण्यासाठी गुगल बार्डची सुरुवात केली. या चॅटबॉटमध्ये गुगलने Magic compose beta हे नवीन फीचर जोडण्यास सुरुवात केली आहे. गुगल बार्डमधील नव्या फीचरमुळे यूजर्संना AI टेकचा वापर करुन संदेशाचा मजकूर लिहिण्यास मदत होणार आहे. मॅजिक कम्पोज बीटा फीचरमुळे लिहिलेला मजकूर रीमिक्स, एक्साइटेड, चिल, शेक्सपियर, लिरिकल, फॉर्मल आणि शॉर्ट या सात वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये रिफ्रेम करणे शक्य होणार आहे. सध्या फक्त RCS-enabled US SIM cards असलेल्या Android फोन्समध्ये ही सेवा उपलब्ध आहे.