ऑनलाइन खरेदी करणे ही सगळ्याच ग्राहकांची पहिली पसंती आहे. पण, एखादा सण असेल तर या ऑनलाइन ॲप्सवर खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. अशातच कधी कधी वस्तू डिफॉल्ट, तर काही वस्तू वेळेतसुद्धा ग्राहकांपर्यत पोहोचत नाहीत. ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या मागणीकडे बघता, हे ओझे कमी करण्याकरिता गूगल कंपनी जीमेल (Gmail) वापरकर्त्यांसाठी एक खास फीचर लाँच करते आहे. कंपनी जीमेलद्वारे ऑनलाइन खरेदी करण्याचा अनोखा अनुभव युजर्सना देणार आहे.

फिल्टर पर्याय :

Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!
Satya Nadella Praised Sharad Pawar for Agricultural Development Trust Baramati
Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
AI Identity and Opportunity career news
कृत्रिम प्रतिमेच्या प्रांगणात: एआय : ओळख आणि संधी
Image of Blinkit's ambulance or a related graphic.
Blinkit Ambulance : ‘१० मिनिटांत अँम्बुलन्स’, ब्लिंकिट आता पुरवणार रुग्णवाहिका सेवा; जाणून घ्या किती असणार शुल्क?

गूगल कंपनीने जीमेल ॲपवर ‘गेट इट बाय डिसेंबर २४’ (Get it by Dec 24) असे एक फिल्टर यूएसए युजर्ससाठी आणले आहे. हे फीचर खरेदीदारांना योग्य वस्तू ओळखण्यास आणि स्वस्त वस्तू शोधण्यास मदत करणार आहे. हे सर्च फिल्टर मोबाइल आणि डेक्सटॉप या दोन्ही उपकरणांवर उपलब्ध असेल. गूगल कंपनीकडून खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे हे फीचर स्वस्त आणि जलद डिलिव्‍हरी पर्यायांसह उपलब्ध असेल. तसेच जीमेल वापरकर्ते त्यांच्या जवळपासच्‍या दुकानामध्‍ये पिकअपसाठी उपलब्‍ध असलेल्‍या किंवा डिलिव्हरीसाठी पात्र असलेल्‍या वस्तू पाहण्‍यासाठी फिल्टरसुद्धा निवडू शकतात.

जीमेल पॅकेज ट्रॅकिंग (Package tracking in Gmail) :

गूगल कंपनी जीमेल फिल्टर्समध्ये वापरकर्त्यांना पॅकेज ट्रॅकिंगचा अनुभवदेखील देणार आहे. तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या महत्त्वाच्या डिलिव्हरी अपडेट्स जीमेलमध्ये दाखवल्या जातील.मोबाइल व डेस्कटॉप दोन्ही डिव्हाइसवर जीमेलवर इनबॉक्समध्ये वैयक्तिक संदेश पाठवला जाईल. त्याव्यतिरिक्त जीमेल पॅकेज ट्रॅकिंग फीचरद्वारे तुमच्या वस्तूच्या डिलिव्हरीसंबंधीच्या तारखेत एखादा बदल होत असेल, तर त्वरित तसे कळवण्यात येईल. तसेच युजर्स जीमेलमधील सेटिंग्जद्वारे हे फीचर कधीही enable किंवा disable करू शकतात.

हेही वाचा…शिक्षण क्षेत्रातही उतरणार एलॉन मस्क! शाळा अन् कॉलेज उभारण्याची तयारी सुरू…

वस्तू परत पाठवणे (Return policy access) :

तसेच गूगल कंपनी एक तिसरे आणि महत्त्वाचे फीचरसुद्धा वापरकर्त्यांना देते आहे आणि ते म्हणजे तुम्ही खरेदी केलेली एखादी वस्तू तुम्हाला न आवडल्यास ती परत दुकानात पाठवून देणे. युजर्स जीमेलच्या मदतीने मर्चंट रिटर्न पॉलिसी (merchant return policies) ॲक्सेसचा वापर करू शकतात. गूगल त्याच्या वापरकर्त्यांना एक सोईस्कर लिंक पाठवेल; तसेच जीमेलच्या सर्च फिल्टरमध्ये तुम्हाला ९० दिवसांच्या आतमध्ये वस्तू परत करण्याची ऑफरसुद्धा असेल.

गूगल कंपनीच्या जीमेलमध्ये या नवीन फीचरचा समावेश केल्यावर युजर्सचा खरेदी करण्याचा अनुभव आणखीन खास होईल. कारण- युजर्सना कमी वेळात त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करणे, डिलिव्हरीवर लक्ष ठेवणे आणि वस्तू न आवडल्यास ती परत करण्याचीही मुभा असणार आहे. हे खास फीचर या महिन्यात यूएसए युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या हे फीचर यूएसएमध्ये लाँच करण्यात आले असले तरीही येत्या काही महिन्यांत हे फीचर भारतासह इतर देशांतही लवकरच लाँच केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

Story img Loader