सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कमर्चाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये मध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. Google ने देखील आपल्या १२,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मात्र या निर्णयानंतरसुद्धा गुगल याबाबतीतील अनेक निर्णय घेतच आहे. कारण गुगल कंपनी आता कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनमध्ये कपात करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, या वर्षांमध्ये अधिक वरिष्ठ पदांवरील बढती करण्याच्या संख्येत कपात करण्यात येईल अशी चेतावणी गुगलने कमर्चाऱ्यांना दिली आहे.
माध्यमांच्या रिपोर्टनुसार कमर्चाऱ्यांना याबाबतीत कंपनीने ईमेल पाठवला आहे. या ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे की, प्रमोशन प्रक्रिया ही मॅनेजरच्या नेतृत्वाखाली आणि ही प्रक्रिया मुख्यतः गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे. आम्ही अतिशय धीम्या गतीने लोकांना कामावर घेत आहोत.
हेही वाचा : आनंदाची बातमी! BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस, ‘या’ राज्यापासून होणार सुरुवात
जर का तुमच्या मॅनेजरला वाटले की तुम्ही प्रमोशनसाठी तयार असाल तर मॅनेजर तुम्हाला नामनिर्देशित करतील. टेक्नॉलॉजीच्या भूमिकेत काम करणाऱ्या कमर्चाऱ्यांना स्वतः च आपले नाव प्रमोशनसाठी द्यायचे असेल तर त्यांना ६ स्टेप पार कराव्या लागणार आहेत. याचाच अर्थ कमर्चारी स्वतःच प्रमोशनसाठी आपले नाव देऊ शकणार आहेत.