आपण सगळे जण इंटरनेटचा वापर करतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण Google वर शोधतो. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची बरीच माहिती मिळते. गुगल हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. मात्र गुगलने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तो मोठा निर्णय कोणता आहे हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुगलने आपली इन अ‍ॅक्टिव्ह अकाउंट पॉलिसी अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या या निर्णयामुळे अनेकांना आपले गुगल अकाउंट बंद होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपडेट पॉलिसीनुसार गुगल दोन वर्षांपासून जी अकाउंट्स वापरण्यात आलेली नाहीत ती अकाउंट्स डिलीट करण्याची घोषणा केली आहे. याबाबतचे वृत्त reuters ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: मोबाइल चोरीला गेलाय? चिंता करू नका; केंद्र सरकारने सुरू केले ‘हे’ पोर्टल, जाणून घ्या खासियत

२०२० मध्येच केली होती याबद्दल घोषणा

गुगलने २०२० मध्येच सांगितले होते, इन अ‍ॅक्टिव्ह अकाउंटमधील स्टोअर केलेला कंटेंट काढून टाकण्यात येईल मात्र अकाउंट डिलीट केले जाणार नाही. मात्र आता गुगलने आपली पॉलिसी अपडेट केली आहे. त्याप्रमाणे आता इन अ‍ॅक्टिव्ह अकाउंट्स डिलीट केली जाणार आहेत.गुगल या वर्षीच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरपासून इन अ‍ॅक्टिव्ह अकाउंट्स डिलीट करण्यास सुरुवात करणार आहे. जर का तुमचे गुगल अकाउंट असेल आणि तुम्ही त्याचा अनेक वर्षे वापरच केला नसेल तर तुम्ही त्याचा वापर करून तुमचे अकाउंट डिलीट होण्यापासून वाचवू शकता.

गुगल दोन वर्षांपासून न वापरलेली अकाउंट्स डिलीट करणार आहे. पण गुगल फक्त अकाउंट डिलीट करणार नसून ज्यांनी डॉक्स, गुगल मीट , ड्रिव्ह आणि कॅलेंडर आणि गुगल फोटो व युट्युब ही अकाउंट वापरली नसतील तर ही अकाउंट्स देखील डिलीट करण्यात येणार आहेत. गुगलचे हे नवीन धोरण केवळ वैयक्तिक गुगल अकाउंट्सलाच लागू होणार आहे. या नवीन धोरणाचा परिणाम हा शाळा आणि व्यावसायिक अकाउंट्सवर होणार नाही.