टेक जायंट गूगल कंपनीने Google Docs युजर्ससाठी एक नव्या फिचरची घोषणा केली आहे. या नव्या फिचरमुळे युजर्सना Google Docs वरील कमेंट्सवर इमोजीद्वारे रिप्लाय देता येणार आहे. कंपनीने यापूर्वी वेबवरील डॉक्सवर इमोजीद्वारे रिप्लाय देण्याचा पर्याय दिला होता.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन फिचर वापरण्यासाठी युजर्नसा विंडोच्या तळाशी-उजव्या कोपर्यात नवीन बटण टॅप करून Google Docs वर इमोजीद्वरे कमेंट करण्याची परवानगी देईल. यामुळे युजर्सना कटेंटवर इमोजीच्या माध्यमातून आपलं मत सहज व्यक्त करता येणार आहे.
Google आता या फिचरच्या रॅपिड रिलीज डोमेनसाठी रोल आउट करत आहे. कंपनी वेबवर येत्या आठवड्यात हे नवीन फिचर आणणार आहे. ३ मे पर्यंत हे फिचर रोल आउट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Google शीवर इमेज अपडेट करण्यास परवानगी
युजर्स आता अॅड्रॉइडवर Google शीटमध्ये एक इमेज ड्रॅग आणि ड्रॉप (कॉपी/पेस्ट) करु शकतात. याशिवाय युजर्स आपल्या कॉन्टॅक्स्ट मेन्यूच्या माध्यामातून ओव्हर-ग्रीड इमेजला इन सेल इमेजमध्ये कन्वर्ट करण्यास सक्षम असेल.
गुगलने रिलीज केले अनेक नवे फिचर्स
गुगल Google Sheets मध्ये आता YouTube स्मार्ट कॅनव्हास चिप जोडत आहे. यामुळे युजर्सना युट्यूब कंटेंट सहजपणे व्यवस्थापित करण्यास मदत होईल. या फिचर्समुळे युजर्सना टॉपिक, डिस्क्रीप्शन आणि व्हिडीओ प्रीव्हूसारखे यूट्युब डाटासह थेट आपल्या स्प्रेडशीट सेलमध्ये जोडण्याची अनुमती देते. टेक जायंटने इमेजला वेगाने बदलण्यासाठी गूगल स्लाइड्समध्ये नवीन ड्रॅग-अँड-ड्रॉप फीचर देखील लाँच केले आहे.