गुगल ड्राइव्ह ही गुगलची क्लाऊड सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. जर आपण मोबाइलवर याचे स्वतंत्र अॅप डाऊनलोड केले तर मोबाइलवरही ही सेवा उपलब्ध होऊन मोबाइलमधील फोटो, व्हिडीओज, पीडीएफ फाइल्स आदी गोष्टी आपण सहजपणे ड्राइव्हवर सेव्ह करून ठेवू शकतो. या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर सहज शेअर करू शकतो. तसेच जीमेलवरच्या अटॅचमेंट्स आपण थेट गुगल ड्राइव्हवरच डाऊनलोड करू शकतो.
Google आपल्या Google Drive App वर लवकरच एन नवीन अपडेट आणणार आहे. या अंतर्गत अँन्ड्रॉईड वापरकर्ते एकाच डिव्हाईस आणि स्क्रीनवर दोन वेगवेगळी ड्राइव्ह अकाऊंट ऑपरेट करू शकणार आहेत. ‘मल्टी अकाउंट सपोर्ट’ असे या नव्या फीचरचे नाव आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स टॅबलेट आणि मोठ्या स्क्रीनच्या अँड्रॉइड फोनवर एकाच वेळी दोन गोष्टी करू शकतील.
समजा तुम्हाला एका ड्राइव्ह खात्याच्या फोल्डरमध्ये XL शीट भरायची आहे आणि त्याचा डेटा दुसर्या खात्यात ठेवला आहे. यापूर्वी हे काम करण्यासाठी दोन ठिकाणी स्वतंत्र अकाऊंट उघडावी लागत होती. पण आता वापरकर्ते एकाच डिव्हाइसवर एकाच वेळी एकाच स्क्रीनवर दोन वेगवेगळी अकाऊंट सहजपणे चालवू शकतील. हे फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ते सर्व लोकांना देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी लॉन्च केले होते ‘हे’ फिचर
गेल्या वर्षी, Google ने Android वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी Google Drive मध्ये ‘Multi Instance Support’ नावाचे फिचर आणले होते. त्याच्या मदतीने, वापरकर्ते एका Google अकाउंटमधील गोष्टी दोन वेगवेगळ्या स्क्रीनवर पाहू शकत होते. तथापि, या फीचरसह एक समस्या अशी होती की फक्त एक Google अकाउंट दोन वेगवगेळ्या स्क्रीनवर चालत असे.