गुगल (Google) ही कंपनी सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एक मानली जाते. तर दोन वर्षांपासून गुगल या कंपनीत काम करणारी एक महिला कर्मचारी आहे. जिने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या तुम्हाला एखादे ध्येय गाठण्यासाठी अगदीच उपयोगी आहेत. गुगलची कर्मचारी कॅनडामध्ये राहते. गुगल कर्मचारी यांनी त्यांच्या अनुभवातून पाच सोपे मार्ग शेअर केले आहेत, जे वय वर्ष २० पर्यंत सगळ्यांना माहीत असणे महत्त्वाचे आहे आणि यापैकी एक करिअरचा सोपा मार्ग म्हणजे ऑफिसबाहेरची ओळख किंवा छंद. तर उत्तम भविष्यासाठी ‘पाच’ सोपे मार्ग कोणते चला पाहूयात.

१. निगोशिएशन करणे. हे एक कौशल्य आहे, जे शिकताही येते आणि सुधारताही येते. महिला कर्मचारीला असे वाटायचे की, एक तर हे कौशल्य आपल्याकडे असते किंवा नसते. पण, कर्मचारी यांना काम करताना समजले की, कोणीही प्रभावीपणे निगोशिएशन करण्यास शिकू शकतो. निगोशिएशन शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील

२. दुसरी गोष्ट म्हणजे विशिष्ट ट्यूशन किंवा क्लास लावणे. ज्यांना करियर सुधारायचे आहे, त्यांच्यासाठी क्लास ही एक मौल्यवान गुंतवणूक आहे. महिला कर्मचारी हिला सुरुवातीला वाटायचे की, श्रीमंत लोकांसाठी किंवा क्लासेस घेणं या क्षेत्रात करियर करणाऱ्या लोकांसाठीच फक्त हे उपयोगी आहे, पण त्यांना आता या गोष्टीची जाणीव झाली की, क्लासेस करियरसाठी एक महत्वाचा टप्पा आहे. कारण एक चांगला प्रशिक्षक तुम्हाला तुमची उद्दिष्टे ओळखण्यात, ती साध्य करण्यासाठी, तसेच योजना आखण्यात आणि तुमच्या प्रत्येक आव्हानांना मात देण्यास मदत करू शकतो.

हेही वाचा…स्मार्टवॉचने पुन्हा केली कमाल! यूके सीईओला आला हृदयविकाराचा झटका! ‘असे’ वाचवले प्राण….

३. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक वागणे. स्वतःशी प्रामाणिकपणाने वागणे अत्यंत महत्वाचे आहे, विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी काम करत असाल, तेव्हा तुमच्याकडून चुका होणे, तुम्ही सगळ्याच गोष्टी करण्यात पारंगत नाही आहात ही गोष्ट स्वीकारणे. तसेच तुम्ही मिळवलेले यश कितीही लहान असले तरीही ते साजरे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही एखादे ध्येय साध्य करता, तेव्हा तुमच्या मेहनतीची प्रशंसा करण्यासाठी वेळ काढा; असे कर्मचारी यांनी सांगितले.

४. चौथी गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करणे थांबवा. कारण प्रत्येकजण त्याच्या अनोख्या प्रवासावर आहे. त्यामुळे इतरांसोबत तुलना करणे योग्य नाही.

५. पाचवी गोष्ट म्हणजे कामाव्यतिरिक्त बाहेर ओळख, छंद किंवा कौशल्य असणे. हे तुम्हाला अधिक संतुलित जीवन जगण्यास मदत करेल आणि ते तुम्हाला अधिक मनोरंजक व्यक्तीसुद्धा बनवेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असाल आणि तुम्हाला संगीताची आवड असेल तर तुम्ही म्युझिक प्रोडक्शन सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी छोटासा प्रयत्न करू शकता असे महिला कर्मचारी हिने सांगितले आहे.सोशल मीडिया ॲप LinkedIn वर गुगल कर्मचारी यांनी हे पाच सोपे मार्ग त्यांच्या पोस्टमध्ये लिहून शेअर केले आहेत.