How to book cheap flights : लांबचा पल्ला लवकर गाठण्यासाठी, वेळ वाचविण्यासाठी अनेक जण विमानाचा प्रवास सोईस्कर मानतात. विमान प्रवास हा आरामदायक आणि थोडा खर्चिक असतो. त्यामुळे विमान प्रवास करणे अनेक जण टाळताना दिसतात. तर तुम्ही देखील असं करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण आता तुम्हाला स्वस्तात विमान प्रवास (How To Book Cheap Flights) करता येणार आहे.
गूगल फ्लाईट्सने (Google Flights) एक नवीन फीचर सादर केले आहे, ज्याचा उद्देश प्रवाशांना स्वस्त फ्लाइट शोधण्यात मदत करण्याचा आहे (How To Book Cheap Flights) , ज्यामुळे ट्रिपसाठी पैसे वाचवणे सोपे होईल. गूगल फ्लाईट्स प्लॅटफॉर्म आधीच किंमत व सोय यांचा समतोल साधणारे सर्वोत्तम पर्याय हायलाइट करत असताना, त्यातच आता नवीन “Cheapest” (स्वस्त) टॅब कमी किमतीचे पर्याय दाखवत आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही थर्ड पार्टी बुकिंग साइट वापरून स्वस्त तिकिटे शोधू शकता. या फीचरमध्ये काही बजेट फ्रेंडली चॉईससुद्धा असू शकतात.
तुम्ही Google Flights वापरून फ्लाइट शोधता तेव्हा प्लॅटफॉर्म तुम्हाला सर्वात बेस्ट पर्याय सुचवते. उदाहरणार्थ स्वस्त दर मिळवण्यासाठी लांबचा थांबा असणाऱ्या फ्लाईट्सचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या विमान कंपन्यांचा वापर करणे, प्रवाशांना आपले सामान स्वतःच उचलून पुढील फ्लाईटसाठी चेक इन करावे लागेल, यासारख्या संकल्पनादेखील लागू होऊ शकतात; त्यामुळे अशा फ्लाईट्समध्ये तुम्हाला काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. हे बजेट-फ्रेंडली फ्लाईट शोधण्यासाठी, गूगलने एक नवीन “Cheapest” (स्वस्त) टॅब जोडला आहे. या टॅबवर क्लिक करून तुम्ही कमी किमतीच्या फ्लाइट्स पाहू शकता. हे नवीन फीचर पुढील दोन आठवड्यांमध्ये जागतिक पातळीवर आणले जात आहे, म्हणून तुम्ही जेथे Google Flights वापरता तेथे तुम्हाला ते लवकरच दिसेल.
या फीचरचा उपयोग करून स्वस्त फ्लाईट तिकीट कशी बुक करायची ? (How To Book Cheap Flights)
सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रवासाची माहिती Google Flights वर द्या . रिझल्ट लोड झाल्यावर तुम्हाला “Best” टॅब दिसेल, जो किंमत आणि सोईचा समतोल साधतो; तर आता एक नवीन “Cheapest” टॅबदेखील आहे, त्यावर टॅप केल्यास तुम्हाला सर्व स्वस्त पर्याय दिसतील. तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये सुट्टी घेऊन पिकनिकला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे फीचर तुम्हाला उपलब्ध, सर्वात स्वस्त विमान प्रवास शोधण्यात मदत करते.