Google will Ban these Apps from May 31: गुगल प्ले स्टोअरने पर्सनल लोन अॅप्स पॉलिसीबद्दल नवीन अपडेट जाहीर केले आहे. या अपडेटसह अनेक अॅप्सवर निर्बंध घातले आहेत, ज्यामुळे युजर्सच्या मोबाईल स्टोअरेजमधून त्यांचे फोटोज, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट, लोकेशन आणि कॉल लॉगमध्ये पोहोचण्यापासून रोखलं जाईल. Google चे नवीन धोरण पुढील महिन्याच्या शेवटच्या म्हणजे ३१ मे २०२३ पासून लागू होणार आहेत.

Google ने आपले नवीन आर्थिक सेवा धोरण जारी करताना जाहीर केले आहे, त्यानुसार ते ३१ मे २०२३ पूर्वी Play Store वर उपलब्ध ऑनलाइन कर्ज देणार्‍या अॅप्सवर बंदी घालतील. अशा परिस्थितीत जे लोक हे अॅप्स वापरतात आणि ज्यांच्या फोनशी संबंधित वैयक्तिक डेटा आहे, त्यांनी त्यांचा डेटा सुरक्षित ठेवावा किंवा डेटा हटवावा, हे लक्षात ठेवणे चांगले होईल, अन्यथा ३१ मे पूर्वी, त्यानंतर त्यांचा डेटा आपोआप हटवले जाईल.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
cash seized in Vasai, Mira Road,
वसई, मिरा रोडमध्ये ७ कोटी ८० लाखांची रोकड जप्त, एटीएम व्हॅनमध्ये संशयास्पद बेकायदेशीर रोकड

अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला?

ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अॅप्सवर अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने या अॅप्सवर कडकपणा वाढवला आहे. हे अॅप्स मर्यादित आहेत जे कर्ज देणारे आहेत.

(हे ही वाचा : iPhone मधील कॅमेऱ्याजवळ काळा डॉट कशासाठी असतो माहितेय का? खरं कारण वाचून व्हाल थक्क )

त्याशिवाय, या अॅप्सवर वापरकर्त्यांचा संपर्क, फोटो इत्यादी संवेदनशील डेटा चोरल्याचा आरोप देखील होता. पर्सनल लोन देणाऱ्या प्ले स्टोअरवरील हजारो अॅप्सवर निर्बंध घालून न्यायालय आणि रिझर्व बँकने दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याला गुगलने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यानंतर कंपनीने परवाना नसलेले लोन अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यासाठी कडक निर्बंध घालणारे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.