एखादी माहिती शोधण्यासाठी आपण सगळेच सर्च इंजिन ‘गूगल’चा वापर करतो. गूगल कंपनीदेखील युजर्ससाठी विविध सोशल मीडिया ॲप्स उपलब्ध करून देत असते. आता गूगल कंपनीने वापरकर्त्यांना अधिक माहिती मिळवण्यासाठी सर्कल टू सर्च हा गूगलचा नवीन पर्याय दिला जाणार आहे. हे खास फीचर तुम्हाला ॲप्स स्विच न करता, इतर अधिक विषयांची अधिक माहिती शोधून देण्यास मदत करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गूगलने वापरकर्त्यांसाठी दोन प्रमुख अपडेट्स जाहीर केले आहेत. पहिला म्हणजे १. सर्कल टू सर्च आणि २. मल्टीसर्च अनुभव. या नवीन अपडेटमध्ये पहिले म्हणजे ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांना ॲप्स स्विच न करता, त्यांच्या डिव्हाइसवर कोणतीही गोष्ट शोधण्यास मदत करणार आहे. याच अपडेटला सर्कल टू सर्च, असे म्हणतात.

गूगलने एकाच ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरील माहिती वापरकर्त्यांना सहज शोधता यावी यासाठी हे अपडेट जारी केले आहे. एखादा फोटो किंवा एखादी महत्त्वाची माहिती गूगल ॲप्सवर मिळत नाही. मग आपण इतर ॲप्सवर जाऊन, ती शोधण्यास सुरुवात करतो. ही बाब लक्षात घेऊन, या समस्येचे निराकरण करणे हेच गूगलचे उद्दिष्ट आहे.

गूगलचे नवीन अपडेट वापरकर्त्यांना त्यांच्या स्क्रीनवरील कोणताही फोटो किंवा माहितीबद्दल क्यूपर्टिनो जायंटचा वापर करून साध्या जेश्चरसह संदर्भ शोधण्यास सक्षम करते. सर्वोत्कृष्ट म्हणजे एकदा सर्कल टू सर्च लोड झाले की, सर्कलिंग, हायलाइट करणे, स्क्रिबल करणे किंवा टॅप करणे यांसारख्या जेश्चरसह तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेली माहिती मिळवू शकता.

हेही वाचा…Ayodhya Ram Mandir: ‘अयोध्या श्रीराम मंदिरात मोफत VIP एंट्री’, ‘या’ बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून राहा सावध…

फॅशनबद्दलचा व्हिडीओ पाहणाऱ्या वापरकर्त्यांना शूज, कपडे किंवा इतर खरेदी करण्यायोग्य पर्याय ऑफर करते. तसेच विशेष म्हणजे तुम्ही एखादा यूट्युब शॉट पाहत असाल, तर तेव्हा तुमच्या आवडत्या अभिनेत्याने घातलेली टोपी शोधण्यासाठीसुद्धा हे अपडेट तुम्हाला मदत करील. सर्कल टू सर्च हे अपडेट फीचर ३१ जानेवारी २०२४ पासून पिक्सेल ८, पिक्सेल ८ प्रो व नवीन गॅलॅक्सी एस२४ आदी फोनमध्ये निवडक प्रीमियम Android स्मार्टफोन्सवर उपलब्ध असेल . हे अपडेट सर्व भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

सर्कल टू सर्च अपडेट फीचर कसे वापरावे?

Android स्मार्टफोनवर सर्कल टू सर्च अपडेट घेण्यासाठी वापरकर्ते होम बटण किंवा नेव्हिगेशन बारवर लॉंग प्रेस करू शकता. उदाहरणार्थ- तुम्ही इन्स्टाग्रामवर रेसिपीचा एखादा व्हिडीओ बघत आहात आणि त्या रेसिपीची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त होम बटणवर लॉंग प्रेस करावे लागेल आणि नंतर स्क्रीनवर दिसणार्‍या ‘डिश’वर तुम्हाला सर्कल (वर्तुळ) करावे लागेल. तुम्ही हे करताच तुमच्यासमोर एक पेज लोड होईल; ज्यामध्ये डिशशी संबंधित माहिती दिली जाईल.

मल्टीसर्च प्लस जनरल एआय (Multisearch + Gen AI) :

सर्कल टू सर्चव्यतिरिक्त गूगलने AI-सक्षम मल्टीसर्च अनुभवदेखील जाहीर केला. गूगल सर्च केवळ मजकुरापुरतेच मर्यादित नसून, क्लिक केलेल्या प्रतिमा किंवा स्क्रीन शॉट्सबाबतचीही माहिती शोधली जाणार आहे. Android किंवा आयओएस वापरकर्त्यांनी गूगल ॲप्सद्वारे लेन्स लाँच करा आणि मल्टीसर्चचा अनुभव घ्या. अमेरिकेतील रहिवाशांव्यतिरिक्त बाकी वापरकर्त्यांना लॅबमध्ये सर्च जनरेटिव्ह एक्स्पिरियन्स (एसजीई) हा ऑप्शन निवडावा लागेल त्यानंतर ते गूगल ॲपद्वारे हे अपडेट डाऊनलोड करून घ्यावे लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google introduces circle to search on your smartphone with new way to search anyway and anywhere asp
Show comments