Google I/O 2023 Program Updates , 10 May 2023: आज Google चा वर्षातील सर्वात मोठा i/o इव्हेंट होणार आहे. यंदाचा गुगलचा हा इव्हेंट एकदम खास असणार आहे. कारण कंपनी यामध्ये पहिल्या पिक्सल फोल्ड हा पहिला फोल्डिंग स्मार्टफोन लॅान्च करणार आहे. तसेच तुम्हाला यामध्ये Pixel 7a चे अधिकृत लॉन्चिंग पाहायला मिळणार आहे. जो लवकरच भारतात देखील येणार आहे.
Google i/o 2023 Program : गुगल त्याच्या AI चॅटबॉट Bard बद्दल देणार माहिती
गुगल पिक्सेल फोल्डमध्ये वापरकर्त्यांना ड्युएल स्क्रीन आणि इंटरप्रीटर मोड मिळणार आहे.
Google Pixel फोल्ड स्मार्टफोन झाला लॉन्च
मागच्या १० वर्षांमध्ये टॅबलेटमध्ये जास्त बदल झाले नाहीत. म्हणून पिक्सल टॅबलेट हे ४ स्पिकर्स, व्हिडीओ कॉलिंगसाठी चांगला कॅमेरा, व्हॉइस टायपिंगसह चार्जिक स्पीकर डॉक असलेले हे पहिले टॅबलेट प्रॉडक्ट गुगलने लॉन्च केले आहे.
Google Pixel 7a मध्ये Tensor G2 चिप येते. तसेच याचा कॅमेरा देखील अपग्रेड करण्यात आला आहे. जे फ्लॅगशिप Pixel 7 आणि Pixel 7 Pro या स्मार्टफोन्सला अधिक शक्तिशाली बनवते.
Google Pixel 7a मध्ये वापरकर्त्यांना Tensor G2 प्रोसेसरसह ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
Google चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Google Pixel 7a लॉन्च
"या उन्हाळ्याच्या शेवटी" येणारे App वापरकर्त्यांना एक नवीन संभाषण सुरु करून देईल. व्हॉईसद्वारे मेसेजला उत्तर आणि कॉल देखील करता येणार आहे.
Universal Translator हे फिचर व्हिडिओला एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. तथापि यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र हे फिचर सध्याच्या काळामध्ये गेमचेंजर ठरू शकते.
१०० अब्जापेक्षा जास्त स्पॅम मेसेज आणि कॉल्सपासून वापरकर्त्यांची संरक्षण करण्यासाठी अँड्रॉइडने AI चा वापर केला.
गुगल डेव्हलपर्स आता Vertex AI नावाच्या एका गोष्टीचा वापर करून विविध मॉडेल्ससह AI प्रॉडक्ट तयार करू शकतात. हे वापरकर्त्यांना चॅट, कंटेंट आणि फोटोजसाठी मूलभूत मॉडेल तयार करून देते. Vertex AI चा भाग म्हणून Imagine, Codey आणि Chirp ही तीन नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातून जनरेटिव्ह AI वर विचारवंतांनी टीका केली. मात्र ही टीका सुरु असताना एआयचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून एआयचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गुगलने लॉन्च केले 'Responsible AI'.
गेल्या काही महिन्यांपासून जभरामध्ये जनरेटीव्ही AI वर अनेक विचारवंतांनी टीका केली होती. मात्र ही टीका सुरु असताना गुगलने आज Responsible AI हे अधोरेखित केले.
Google Search हे Alphabet Inc. कंपनीचे प्रॉडक्ट आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. गुगल सर्च हे AI च्या मदतीने वापरकर्त्यांना सर्च केलेल्या विषयाबद्दल सर्वसमावेशक परिणाम देते. तसेच चांगले डिटेल्स आणि विषयांचा अनुभव देते. नवीन अनुभव हा गुगलच्या रँकिंग आणि safdety सिस्टीमवर आधारित आहे.
गुगल सर्चची नवीन AI फिचर सर्च लॅब्ससाठी साइन अप करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपल्बध असणार आहे. रजिस्ट्रेशन असणाऱ्या वापरकर्त्यांना वेटिंगलिस्टमध्ये जोडले जाईल. साइन आप करण्यासाठी g.co/labs वर क्लिक करावे.
Goggle सर्च हे AI संचालित स्नॅपशॉटसह अधिक स्मार्ट बनणार आहे. ज्यामुळे लोक अधिक किचकट असणारे विषय शोधू शकणार आहेत.
गुगल सर्च हे अल्फाबेट कंपनीचे प्रॉडक्ट आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. AI च्या मदतीने हे सर्वसमावेशक परिणाम देते जे डिटेल्स आणि सब्जेक्ट यांचा चांगला अनुभव देते.
तुम्हाला जर का तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर आता काळजी सोडा. कारण Duet AI तुमचा व्यवसाय वाढीसाठी मदत करणार आहे.
Google ने Workspace आणि Gmail, Docs व Meet Apps साठी Duet AI ची घोषणा केली.
गुगल १८० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये Bard सुरु करणार आहे. वापरकर्ते आता बार्डशी जपानी व कोरिअन भाषेत संवाद साधू शकणार आहेत. भविष्यात बार्ड ४० भाषांमधून संवाद साधणार आहे.
AI बार्ड आता गुगल लेन्समध्ये काढलेल्या फोटोजना कॅप्शन देणार आहे. तसेच अडोब फायरफ्लाय बार्ड देखील तुमची मदत करणार आहे. याला तुम्ही जशी सूचना द्याल त्या पद्धतीने तुम्हाला हवे तसे फोटोज तयार करणार आहे.
Google I/O 2023 हा इव्हेंट माउंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया) मधील शोरलाइन अॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे.