Google I/O 2024 Live Updates Today : गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्सला अवघ्या अडीच तासांमध्ये कॅलिफोर्नियात सुरुवात होत असून संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. भारतात आज मंगळवारी १०:३० वाजता या लाईव्ह इव्हेंटची सुरुवात होईल. गुगलचे सीइओ सुंदर पिचई याच परिषदेत अवघं जग कवेत घेणाऱ्या मोबाईलवरील अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या नव्या आवृत्तीची अर्थात अँड्रॉइड १५ ची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Google I/O 2024 Live Today, 14 May 2024 : लाईव्ह अपडेट्स वाचा

22:48 (IST) 14 May 2024

अमेरिकेत या आठवड्यापासून जेमिनी AI चा वापर करता येणार…

22:40 (IST) 14 May 2024

गुगल म्हणतंय सुरू होतंय जेमिनी पर्व!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

22:38 (IST) 14 May 2024
मोबाईलवरही उपलब्ध होणार जेमिनी AI

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

22:35 (IST) 14 May 2024

मेकिंग AI वर्क फॉर एव्हरीवन- गुगल कॉन्फरन्सची यंदाची थीम

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

22:29 (IST) 14 May 2024
आकर्षणबिंदू !

गुगलतर्फे आज होत असलेल्या घोषणांचे केंद्रस्थान… आकर्षणबिंदू! इथूनच सीइओ सुंदर पिचाई आज नव्या घोषणा करतील…

(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)

22:26 (IST) 14 May 2024

गुगलची कॉन्फरन्स होत असलेल्या कॅलिफोर्नियातील माऊंटनव्ह्यू कॅम्पसमधील तंत्रप्रेमींची गर्दी…

22:23 (IST) 14 May 2024
गुगलचे चाहते मोठ्या संख्येने कॅलिफोर्नियात दाखल !

गुगलचे डेव्हलपर्स आणि चाहते मोठ्या संख्येने कॅलिफोर्नियात येऊन दाखल झाले असून आता येत्या १५ मिनिटांत यंदाच्या आय/ ओ कॉन्फरन्सला सुरुवात होईल…

22:19 (IST) 14 May 2024
गुगल पिक्सीही असेल नवीन आकर्षण?

सध्या गुगलच्या विविध उपकरणांवर गुगल असिस्टंट वापरकर्त्यांच्या मदतीसाठी धावून येतो. पण, कदाचित आता त्याची जागा असिस्टंटची नवीन आवृत्ती ‘पिक्सी’ घेण्याची शक्यता असून त्याचीही घोषणा सीइओ सुंदर पिचाई याच कॉन्फरन्समध्ये करतील, अशी माहिती माहितगारांनी दिली. येत्या काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या गुगल पिक्सेल ९ मध्ये पिक्सी दाखल होईल मात्र त्याची चुणूक आजच्या कार्यक्रमात पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

22:14 (IST) 14 May 2024
गूगलचा लाईव्ह इव्हेंट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

21:53 (IST) 14 May 2024
गुगल असिस्टंटची जागा घेणार जेमिनी?

गेल्या वर्षी म्हणजेच २०२३च्या डिसेंबर या अखेरच्या महिन्यामध्ये गुगलने जेमिनी हे त्यांचे AI मॉडेल लाँच केले. या एआयला फोटो, व्हिडिओ, आवाज, कोड आणि मजकूर आदी वाचून त्याचे त्वरित विश्लेषण करून प्रसंगी उत्तर देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता गुगल जेमिनी सर्वतोपरी तयार असून आज होत असलेल्या या कॉन्फरन्समध्ये सीइओ सुंदर पिचई गुगलच्या सर्व उपकरणांना जेमिनी जोडले जाईल, अशी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. सध्या गुगलच्या सर्व उपकरणांवर असलेल्या गुगल असिस्टंटची जागा आता जेमिनी घेईल, अशी चर्चा आहे.

(फोटो सौजन्य: @Google)

21:39 (IST) 14 May 2024
अँड्रॉइड १५ मध्ये असणार तरी काय?

गुगलच्या नव्या अँड्रॉइड १५ या ऑपरेटिंग सिस्टिमची घोषणा आता तासभरात होणे अपेक्षित आहे. आज गुगलतर्फे केल्या जाणाऱ्या घोषणांमध्ये ही सर्वाधिक मोठी घोषणा असेल असे संकेत गुगलकडून मिळाले आहेत. ऑपरेटिंग सिस्टिमच्या या नव्या आवृत्तीमध्ये जनरेटिव्ह AI ची जोडणी मोबाईलमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना पूर्णपणे नवा अनुभव मिळेल. कॅमेऱ्याला मिळालेली AI ची जोड वापरकर्त्यांचा दृश्यअनुभव पूर्णपणे बदलणारी आणि वेगळ्या पद्धतीने फोटो टिपणारी असेल. याशिवाय यामध्ये ॲप आर्कायव्हिंची सोय असेल त्यामुळे मोबाईलमधील मेमरी मोकळी राहील आणि व्हायरसचा धोकाही कमी होईल.

Android 15 official logo (Image credit: Google)

21:31 (IST) 14 May 2024
ब्रेकिंग न्यूज- आता मोबाईलच्या कॅमेरा ॲपला गुगल जेमिनी AI ची जोड :

सोमवारी संध्याकाळी उशिरा गुगलने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात मोबाईल कॅमेरा ॲप AI च्या मदतीने किती अधिक हुशारीने काम करू शकतो, ते दाखविले आहे. यात मोबाईल सुरू केल्यानंतर वापरकर्ता जेमिनीला प्रश्न विचारतो की, तुला या कॅमेऱ्यामधून काय दिसते आहे. गुगलच्या ज्या ॲम्पिथिएटरमध्ये हा वापरकर्ता आहे, त्याचे वर्णन जेमिनी एआय तर्फे केले जाते आणि नंतर जेमिनीला प्रश्न प्रश्न विचारले जातात, काय दिसतेय. त्यावर ही गुगलची कॉन्फरन्स नेहमीच काही तरी इन्नोव्हेशन घेऊन येते आणि यंदाही अशीच खास योजना आहे, असे उत्तर जेमिनी देते. या व्हिडिओने आता गुगलचे AI सामान्य माणसाच्या हातातील मोबाईलला जोडले गेल्याने आपल्या दैनंदिन आयुष्यात नेमका काय फरक पडणार या विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.

21:17 (IST) 14 May 2024
आता मोबाईलवरही असेल AI चे राज्य!

इंटरनेटच्या जगातील बादशहा असलेल्या गुगलतर्फे येत्या काही तासांत जगभरातील सर्वात मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते येणाऱ्या काळात मानवी जीवन आणि वर्तन आमूलाग्र बदलणाऱ्या AI तंत्रज्ञानाकडे. गुगलशी संबंधित सर्व उपकरणे- डिव्हायसेस गुगलच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स सिस्टिमशी जोडली जाणार असून त्यामुळे जगभरात प्रत्येकाहाती असलेल्या मोबाईलवरही एआयचे राज्य सुरू होईल. गुगलची अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम जगभरातील सर्वाधिक मोबाईल डिव्हायसेसवर वापरली जाते. AI च्या संदर्भातील हे संकेत गुगलने सीइओ सुंदर पिचई यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्येच दिले आहेत.

21:03 (IST) 14 May 2024
Google I/O Event 2024 Live:

सुंदर पिचाई यांची पहिली लिंक्डइन पोस्ट, इव्हेंट निमित्ताने Google च्या सीईओंनी काय शेअर केले ते पाहा…

20:45 (IST) 14 May 2024
Google I/O Event 2024 Live:

आज मंगळवारी रात्री १०:३० वाजता गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या भाषणाने या लाईव्ह इव्हेंटची सुरुवात होईल.

Google I/O 2024 Live Updates Today, 14 May 2024 : लाईव्ह अपडेट्स वाचा