Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगलवर आपल्या एखाद्या विषयाशी संबंधित कोणतीही माहिती शोधू शकतो. ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केल्यानंतर गुगलने देखील आपले ‘Bard’ लॉन्च केले आहे. आता गुगलने बुधवारी भारतातील डेव्हलपर्सना सक्षम करण्यासाठी अनेक AI टूल्सची घोषणा केली आहे. कंपनीने बंगळुरू येथे देशातील पहिली I/O Connect डेव्हलपर्स कॉन्फरन्स आयोजित केली होती.
तसेच कंपनीने गुगल मॅप्स प्लॅटफॉर्ममध्ये Address Descriptors नावाच्या नवीन फीचरची घोषणा केली आहे. कंपनीचे हे फिचर देशातील २५ पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. वापरकर्त्यांना एखाद्या ठिकाणाचे नाव वापरून पत्ता शोधण्यासाठी हे फिचर मदत करेल अशा प्रकारे याचे डिझाईन करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
हेही वाचा : WhatsApp Feature: व्हॉट्सअॅपच्या करंट आणि लाईव्ह लोकेशनमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या
IISC बंगळुरूच्या मदतीने गुगल AI चा वापर करून भारतीय भाषांना डिजिटल करण्यासाठी ‘प्रोजेक्ट वाणी’ वर काम करत आहे. ज्यामध्ये ३८ भाषा आणि ४ हजार तासांच्या भाषणाचा डेटाचा समावेश आहे असा सर्व डेटा कंपनीने डेव्हलपर्सना उपलब्ध करून दिला आहे.
हेही वाचा : Jio, Airtel आणि Vi चे ‘हे’ आहेत एंट्री लेव्हल पोस्टपेड प्लॅन्स, मिळणारे फायदे एकदा पहाच
त्याचप्रमाणे गुगलने एक नवीन स्टार्टअप क्रेडिट प्रोग्रॅम जाहीर केला आहे. ज्यामध्ये ONDC चा वापर करणाऱ्या कंपन्या $२५,००० च्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात. PaLM API, MakerSuite आणि Vertex AI हे कंपनीचे AI टूल्स आता भारतीय डेव्हलपर्ससाठी उपलब्ध असतील असे कंपनीने घोषित केले. तसेच या कॉन्फरन्समध्ये गुगलने स्टुडिओ बॉट सारखी अनेक आगामी AI वॉर आधारित टूल्स देखील प्रदर्शित केली. जे डेव्हलपर्सना अधिक सहजपणे कॉड करण्यासाठी मदत करतील. कंपनीने हे देखील स्पष्ट केले की, भारतामध्ये स्मार्टवॉच श्रेणीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तसेच हा देश जगातील स्मार्ट टीव्हीसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे.