कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात. याच Google चा यंदाचा वार्षिक इव्हेंट हा Google I/O मे २०२३ या महिन्यात होणार असून गुगलने याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

गुगलचा हा वार्षिक इव्हेंट Developer Conference हा कॅलिफोर्निया येथे आयोजित केला जाणार आहे. . ‘I/O’ म्हणजे इनपुट/आउटपुट होय. या इव्हेंटची टॅगलाईन ही ‘Innovation in the Open’ अशी आहे. हा कार्यक्रम गुगल डेव्हलपर डे सारखाच आहे. Google I/O हा इव्हेंट पहिल्यांदा २००८ मध्ये आयोजित करण्यात आला होता. तेव्हपासून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. मात्र करोना महामारीच्या काळामध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला नव्हता. google या वर्षीच्या इव्हेंटमध्ये अनेक प्रॉडक्ट लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे.

France ai summit loksatta news
फ्रान्समध्ये आजपासून ‘एआय’ शिखर परिषद
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Google Pixel 9a Feature And Launch Date
Google Pixel 9a खरेदी करणाऱ्यांना ‘या’ ॲपचे मिळणार फ्री सब्स्क्रिप्शन; कधी होणार लाँच? घ्या जाणून…
group of friends arranged birthday party for street dog
चर्चा तर होणारच! श्वान लूडोचा ‘असा’ साजरा केला वाढदिवस; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी तरुण मंडळींचे केले कौतुक
elephants proposed to their partner with Flowers
सोंडेत धरली फुले अन्… हत्तीने त्याच्या पार्टनरला केले असे प्रपोज; पाहा व्हायरल VIDEO
Ambedkar statue vandalism Ludhiana protest fact check
अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, निषेधार्थ हजारो लोक उतरले रस्त्यावर; मोर्चाचा VIDEO होतोय व्हायरल? पण, सत्य काय वाचा
Grandmother dance on marathi song Khanderayachya Lagnala Banu Navri Natali video goes viral
VIDEO: “खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली…” भर कार्यक्रमात नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स
Who is Liang Wenfeng?
Liang Wenfeng : लियांग वेंगफेंगची जगभर चर्चा! कोण आहे अमेरिकेत खळबळ उडवून देणाऱ्या ‘डीपसीक’चा कर्ताधर्ता?

हेही वाचा : VIDEO: Google च्या सर्वात मोठ्या इव्हेंटची तारीख जाहीर; लॉन्च होणार Android 14 आणि…

हा इव्हेंट १० मे रोजी होणार आहे. google हा इव्हेंट काही मर्यादित लोकांसहच करते. म्हणजेच या इव्हेंटसाठी प्रेक्षकांना निमंत्रण नसते. तुम्ही यंदाचा गुगलचा हा इव्हेंट युट्यूब चॅनल आणि वेबसाईटच्या माध्यमातून १० मे रोजी १०.३० वाजल्यानंतर बघू शकणार आहात.

इव्हेंटमध्ये काय काय होणार लॉन्च ?

Android 14: गुगल या कार्यक्रमामध्ये अँन्ड्रॉईड १४ ला बीटा टेस्टर्ससाठी लॉन्च करू शकते. काही महिन्यांनी हे सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात येणार आहे. अँड्रॉइड १४ मध्ये मिळणाऱ्या अनेक नवीन फीचर्सची माहिती या इव्हेंटमध्ये दिली जाणार आहे. ज्यामध्ये सर्वात खास ‘Back Gesture’ हे फिचर असणार आहे.

AI Bard: गुगलच्या या इव्हेंटमध्ये AI bard देखील सादर केले जाणार आहे. कंपनी याबद्दल या इव्हेंटमध्ये अधिकची माहिती वापरकर्त्यांना आणि ग्राहकांना देऊ शकते.

हेही वाचा : WhatsApp वर iOs युजर्सना मिळणार ‘हे’ अपडेट; जाणून घ्या काय होणार फायदा

Pixel 7a : गुगलचा नवीन स्मार्टफोन Pixel 7a या इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे. विक्रीसाठी हा स्मार्टफोन काही कालावधीनंतर उपलब्ध होणार आहे. यामध्ये Google Tensor G २ चिपसेट आणि ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले व ४४०० mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स मिळू शकतात.

Google Pixel Fold: या इव्हेंटमध्ये गुगल आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये ७.६ इंचाचा प्रायमरी आणि ५.८ इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळणार आहे. तसेच हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च होऊ शकतो.

Story img Loader