तुम्ही नेहमी गुगल वापरता का? मग तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला माहित असेलच की Google हे जगातील सर्वात शक्तिशाली साधन आहे. तुम्ही जर त्याचा योग्य वापर केल्यास तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आपण कोणतीही गोष्ट माहित नसेल तर पटकन आपल्या फोन, लपॅटॉप किंवा कॉम्प्युटरवर सर्च करतो. सर्वात जवळचे रेस्टॉरंट शोधण्यापासून आणि फ्लाइटच्या किंमती पाहण्यापर्यंत, गुगल लेन्स वापरून कोणतीही वस्तू शोधण्यापासून ते कोणताही माहिती भाषांतरीत करण्यासाठी अनेक गोष्टींसाठी आपण गुगल टूल्सचा वापर करत असतो. आज आम्ही तुम्हाला ८ गुगलिंग टिप्स सांगणार आहोत ज्या ९९ टक्के लोकांना माहीत नसतील पण, त्या जाणून घेतल्यानंतर तुमचे काम खूप सोपे होईल.

८ गुगलिंग टिप्स सांगणार आहोत ज्या ९९ टक्के लोकांना माहित नाही

१. नको असलेले रिझल्ट काढून टाकण्यासाठी (-) वजाबाकीचे चिन्ह वापरा

कित्येकदा आपण एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला मिळाणाऱ्या रिझल्टमध्ये बहुतांश माहिती नको असलेली असते. असा वेळी तुम्ही नको असलेल्या माहितीच्या आधी – हे वजाबाकीचे चिन्ह वापरून हवा तो योग्य रिझल्ट मिळवू शकता.

उदां. इलेक्टॉनिक बाईक्स – २०२३ असे सर्च कर शकता

२. गुगर क्रोमवर Ctrl + Shift + T हे बटन दाबून तुम्ही नुकताच बंद केलेला टॅब पुन्हा ओपन करू शकता

कित्येकदा गुगर क्रोमवर काम करता असे होते की चूकून एखादा टॅब आपल्याकडून बंद होतो. तो पुन्हा उघडण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन हिस्ट्रिीमध्ये दिसणारा टॅब पुन्हा ओपन करावा लागतो. हे सर्वात कधी उगाच वेळ वाया जातो त्यापेक्षा असे झाल्या तुम्ही पटकन Ctrl + Shift + T हे बटन एकत्र दाबून ठेवा, नुकताच बंद झालेला ट्रब पुन्हा सुरु होईल.

३. अचूक रिझल्टसाठी वापरा ”अवतरण चिन्ह”

जर तुम्हाला गुगलवर एखादी विशिष्ट गोष्ट सर्च करायची असेल तर तुम्ही त्या शब्दभोवती ”अवतरण चिन्ह” वापरू शकता, त्यामुळे तुम्हाला अचूक रिझल्ट मिळेल. प्रत्येक रिझल्टमध्ये तुम्ही अवतरण चिन्हांमध्ये वापरलेला शब्द तुम्हाला दिसेल.

४. समानर्थी शब्द शोधण्यासाठी टाईड( ~) हे चिन्ह वापरा

तुम्हाला एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा असेल तर त्यापुढे फक्त ( ~) हे चिन्ह वापरा. तुम्हाला त्या शब्दाचे सर्व समानार्थी शब्द रिझल्टमध्ये दिसतील.

५. दोन कालखंडातील माहिती शोधताना .. हे चिन्ह वापरा

जेव्हा तुम्ही दोन कालखंडातील माहिती शोधता तेव्ही तुम्ही त्या संख्यांच्यामध्ये .. हे चिन्ह वापरा. तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळेल.

६. फाईल टाईप :

कोणत्याही दस्तावेजाचा प्रकार म्हणजेच फाईल टाईप शोधण्यासाठी त्यापुढे फाईल टाईप : असे वापरा तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळेल.

उदाहरणार्थ – वॉरेन बफेट फाईल टाईप : पीडीएफ असे सर्च करू शकता.

७. लोकेशन( ठिकाण)
तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाण शोधण्यासाठी तुम्ही लोकेशन: असे वापल्यास तुम्हाला अचूक रिझल्ट मिळेल

उदा. एलॉन मस्क लोकेशन: सॅन फ्रॅन्सिस्को असे सर्च करू शकता.

८. गुगर क्रोमवर Ctrl + Shift + T हे बटन दाबून ओपन करा incognito टॅब ओपन करू शकता.

तुम्हाला वैयक्तिक गोष्टी सर्च करण्यासाठी incognito टॅब वापरू शकता जिथे तुमची कोणतीही हिस्ट्री ट्रक केली जात नाही. हा टॅब ओपन करण्यासाठी Ctrl + Shift + T हे बटन किबोर्डवर दाबून ठेवा.

या सोप्या गुगल टिप्स वापरा आणि तुमचे काम अधिक सोपे करा.

Story img Loader