यूट्यूब (YouTube) क्रिएटर्ससाठी महत्त्वाची माहिती आहे. या पॉप्युलर व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एक फिचर बंद होणार आहे, पुढील महिन्यात २६ जूनपासून युट्युब स्टोरीजचा( YouTube Stories ) पर्याय बदं होणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे. युट्युबने सांगितले की ज्या स्टोरीज २६ जूनच्या आधी लाइव्ह आहे ते शेअर केलेल्या तारखेच्या ७ दिवसांनतर बंद होऊ शकतात. २६ जूनपासून कोणत्याही युट्यब क्रिएटरला स्टोरीजचा(Stories) पर्याय मिळणार नाही.
युट्युबचे स्टोरीज फीचर होणार बंद
गुगलची मालकी असलेली युट्य़ुबने सन २०१७मध्ये युट्युब स्टोरीज फीचरची सुरुवात केली होती. त्यासाठी क्रिएटर आपले मोठे व्हिडिओज प्रमोट करत आहे. ब्लॉग पोस्टमुळे हे देखील समजले आहे की कंपनी व्हिडिओसंदर्भात दुसऱ्या पद्धतीने युट्यूब शॉर्ट्स, लाइव्ह इत्यादीवर लक्ष्य केंद्रीत करू इच्छित आहेत. युटयुबने असे सांगितले की. या मुख्या वैशिष्ट्यांना प्राथमिकता देण्यासाठी स्टोरीजला बंद करावे लागेल. युट्युबने कॉन्टेंट क्रिएटरर्सला सांगितले की ते कम्युनिटी पोस्ट आणि युट्युब शॉर्ट्सवर आपला फोकस करू शकतात.
हेही वाचा – Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फक्त ७५ रुपयांमध्ये मिळेल अनलिमिडटेड कॉलिंग, डेटा आणि कित्येक फायदे
युट्यूब कम्युनिटी पोस्ट आणि शॉर्ट्सवर करणार लक्ष केंद्रित
वेगवेगळ्या माध्यमातून युट्यूबवर आपले क्रिएटर्सला सध्याच्या डेव्हलपमेंटची सुचना दिली जाईल. फोरम पोस्ट, इन अॅप मेसेज, रिमाइंटमार्फत सांगितले जाईल की, युट्यूब स्टोरीज बदं केले जाऊ शकते. याचे खास कारण आहे की, स्टोरीज फीचर युट्यूबचे उत्पादन नव्हते. हे स्नॅपचॅटवरुन प्रेरणा घेऊ तयार केले होता. हे फीचरने त्या क्रिएटर्ससाठी होते जे सब्सक्राईब्रर्सला एक निश्चित सीमेपर्यंत पोहचू शकतात आणि छोटा व्हिडिओमार्फत आपल्या मोठ्या व्हिडिओजला प्रमोट करू इच्छितात. आता कंपनीने कम्युनिटी पोस्ट आणि युट्यूब शॉर्ट्सवर लक्ष केंद्रित करणार आहे.
हेही वाचा – BSNLचा नवा प्लॅन! 49 रुपयांच्या एका रिचार्जमध्ये मिळणार सात ओटीटी अॅप्स, असा घ्या सुविधेचा लाभ
क्रिएटर्ससाठी युट्यूबने सुरू केलं पार्टनर प्रोग्रॅम अग्रीमेंट
या वर्षाच्या सुरुवातीला युट्यूबने सांगितले की हे शॉर्ट्स व्हिडिओ तयार करण्यासाठी क्रिएटर्ससाठी जाहीरातीतून झालेली कमाई वाटण्यास सुरुवात केली होते. कमाईपैकी ५५ टक्के हिस्सा युट्युब घेणार आणि ४५ टक्के हिस्सा क्रिएटरला मिळणार. हा प्रोग्रॅम १ फेब्रवारीपासून सुरू झाले आहे. युट्यूबने या साठी नवीन पार्टनर प्रोग्रॅम अग्रीमेंट देखील सुरू केले आहे, ज्याला स्विकारण्यासाठी क्रिएटर्सला १० जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.